तामिळनाडू सरकारने प्राण प्रतिष्ठाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

तामिळनाडू सरकारने प्राण प्रतिष्ठाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली?

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. दुसरीकडे या मुद्द्यावरून राजकारणही तीव्र झाले आहे.विरोधकांनी या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर सत्ताधारी पक्ष भाजपकडून हल्लाबोल केला जात आहे. आता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर मोठा आरोप केला आहे. तामिळनाडू सरकारने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.

ट्विटरवर पोस्ट करत अर्थमंत्र्यांनी लिहिले की, ‘तामिळनाडू सरकारने २२ जानेवारी रोजी राम मंदिराशी संबंधित कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण पाहण्यास बंदी घातली आहे. तामिळनाडूमध्ये श्रीरामाची २०० हून अधिक मंदिरे आहेत. तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभाग (HR&CE) द्वारे चालविण्यात येणाऱ्या मंदिरांमध्ये श्री रामाच्या नावाने पूजा/भजन/प्रसादम/अन्नदान करण्यास बंदी घातली आहे.खासगी मंदिरांनाही पोलीस कार्यक्रम आयोजित करण्यापासून रोखत आहेत. आयोजकांना धमकी देण्यात येत आहे.या हिंदुद्वेषी, घृणास्पद कृतीचा मी तीव्र निषेध करते, असा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर आरोप केला आहे.

हे ही वाचा:

अंतराळातून राम मंदिर कसं दिसतं?, इस्रोने पाठवला फोटो!

दिल्ली एम्सचा यु-टर्न, २२ जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंदचा निर्णय मागे!

ओवेसी लवकरच रामभक्त होतील अन ‘राम-नामाचा’ जप करतील!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्या कारसेवेला हजर असल्याचा सादर केला पुरावा!

त्या पुढे म्हणाल्या की, ‘तामिळनाडूच्या अनेक भागात हृदयद्रावक आणि विचित्र दृश्ये पाहायला मिळत आहेत. लोकांना भजन आयोजित करण्यापासून, गरिबांना जेवण देण्यापासून, मिठाई वाटण्यापासून, उत्सव करण्यापासून रोखले जात आहे आणि त्यांना धमकावले जात आहे. लाइव्ह टेलिकास्ट दरम्यान वीज खंडित होण्याची शक्यता असल्याचे केबल टीव्ही ऑपरेटर्सना सांगण्यात आले आहे.INDI आघाडीचा मुख्य भागीदार असलेल्या DMK ची ही हिंदुविरोधी चाल आहे, असे अर्थमंत्र्यांनी लिहिले आहे.

दरम्यान, मंत्री शेखर बाबू यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.तामिळनाडूमधील कोणत्याही मंदिरात पूजा करण्यास किंवा अन्नदान करण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.

Exit mobile version