आता गुजरातमध्ये उभी राहतेय भगवान द्वारकाधीशांची १०८ फूट उंचीची मूर्ती

द्वारका देवभूमी कॉरिडॉरचे काम जन्माष्टमीपासून सुरू होणार

आता गुजरातमध्ये  उभी राहतेय भगवान द्वारकाधीशांची  १०८ फूट उंचीची मूर्ती

काशी विश्वनाथ, महाकाल लोक आणि मथुरा कॉरिडॉर नंतर आता गुजरातमधील द्वारका मध्ये देवभूमी कॉरिडॉर बनवण्याची तयारी सुरू आहे. पश्चिम भारतातील सर्वात मोठे अध्यात्मिक केंद्र आध्यात्मिक केंद्र येथे उभारण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. इतकेच नाही तर भगवान द्वारकाधीश यांची १०८ फूट उंचीची मूर्ती साकारण्यात येणार आहे. ही कृष्णाची सर्वात उंच मूर्ती असल्याचे सांगितले जाते. द्वारका देवभूमी कॉरिडॉरचे काम जन्माष्टमीपासून सुरू होणार आहे.

मध्यप्रदेशातल्या उज्जैन येथील महाकाल लोकांच्या धर्तीवर द्वारकाधीश मंदिरापासून द्वारका बेट आणि ज्योतिर्लिंग नागेश्वरापर्यंतची द्वारकेतील सर्व मंदिरे जोडली जाणार आहेत. यामध्ये द्वारकाधीश मंदिर, रुक्मिणी-बलराम मंदिर, सणवालियाजी मंदिर, गोवर्धननाथ मंदिर, महाप्रभू बैठक, वासुदेव, हनुमान मंदिर ते नारायण मंदिर यांचा समावेश आहे.
द्वारके पासून १३ किमी अंतरावर असलेल्या शिवराजपूर बीच आणि २३ किमी अंतरावरील ओखा बीचचा चेहरामोहरा बदलण्याची योजना आहे.

द्वारका बेटाला जागतिक दर्जाचे बनवण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १३८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. इको टुरिझम, वॉटर स्पोर्ट्स, मरीन इंटरप्रिटेशन सेंटर, लेक फ्रंट, डॉल्फिन व्ह्यूइंग गॅलरी यासह अनेक प्रकल्प येथे सुरू होतील. जलमग्न द्वारका शहर पाहण्यासाठी खास गॅलरी तयार करण्यात येणार आहे.

शिवराजपूर बीच हा देशातील सर्वोत्तम समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो. या बीचकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जलक्रीडासोबतच टेंट सिटी बनवण्यात येत आहे. अरायव्हल प्लाझा, सायकल ट्रॅक, इव्हेंट ग्राउंड, अॅम्फी थिएटर, फोर्ट रिस्टोरेशन, लाईफ गार्ड टॉवर, चिल्ड्रन्स प्ले एरिया यासह ५५ प्रकारची कामे सुरू झाली आहेत.ओखा ते बेट द्वारका जोडणारा सिग्नेचर ब्रिज तयार करण्यात येत आहे. या २,३२० मीटर लांबीच्या चार लेन पुलाला देशातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज म्हटले जाते. यासाठी ८७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

…तर अजित पवारांची गणना अंधभक्तांत होईल!

लिट्टेला सक्रिय करण्याचा कट , एनआयएची छापेमारी, मोठ्या प्रमाणावर रोकड ,ड्रग्ज जप्त

शरद पवारांनी केली विचारवंत, पुरोगाम्यांची कोंडी

कर्नाटक स्पोर्टिंगने जिंकली पद्माकर तालीम शिल्ड

द्वारकेचा इतिहास होणार कथन
देवभूमी कॉरिडॉर योजनेंतर्गत भगवान द्वारकाधीश यांची १०८ फूट उंचीची मूर्ती साकारण्यात येणार आहे. ही कृष्णाची सर्वात उंच मूर्ती असल्याचे सांगितले जाते. गोमती काठावरील पंचकुई परिसरात ही मूर्ती तयार केली जाणार आहे. जन्माष्टमीला भूमिपूजन होणार आहे. द्वारकेचा इतिहास, संस्कृती आणि धार्मिक महत्त्व दर्शविणाऱ्या मूर्तीवर ध्वनी आणि प्रकाश प्रदर्शन होणार आहे.

लक्ष्मीनारायण मंदिर परिसराचे रुपडे बदलणार
लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रांगणात एक ऐतिहासिक वृक्ष आहे. दुर्वास ऋषींनी येथे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. हे झाड पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. गोपी तालाबचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. हे ते दैवी स्थान आहे. या तलावाच्या मातीला गोपी चंदन म्हणतात.

 

 

Exit mobile version