अतिक अहमद सारख्या गुंडाच्या मुसक्या आवळल्याबद्ल आणि उमेश पालच्या हत्येमध्ये सामील असलेल्या बदमाशांवर योगी सरकारने कारवाई केल्या बद्दल अनेकदा पूजा पाल यांनी योगी सरकारचे कौतुक केले आहे.त्या दरम्यान पूजा पाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती. मात्र,समाजवादी पार्टीची आमदार असलेली पूजा पाल आता भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.जर पूजा पाल यांनी भाजपात प्रवेश केला तर अखिलेश यादव यांना मोठा धक्का बसू शकतो असे मानले जात आहे.
सध्या पूजा पाल या समाजवादी पार्टीच्या आमदार आहेत. उमेश पाल हत्याकांड आणि अतिक अहमह त्याचा भाऊ अशरफ याच्या हत्येनंतर त्या कायम चर्चेत आहेत. अतिक अहमद याच्या मुसक्या आवळल्याबद्ल आणि उमेश पालच्या हत्येमध्ये सामील असलेल्या बदमाशांचा सामना करण्यासाठी तिने योगी सरकारच्या अनेकदा कौतुक केले आहे. या संदर्भात पूजा पाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती. पूजा पाल ही राजू पालची पत्नी आहे ज्याची हत्या अतिक अहमदने केली होती. पूजा ही पाल समाजातील एक मजबूत महिला नेत्या म्हणून ओळखले जाते. आता त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
अखिलेश यादव यांना झटका देण्याच्या प्रयत्नात भाजपची सतत नजर ओबीसी नेत्यांवर असते. पाल यांना पक्षात घेऊन गुंडाराज यांच्यावर कारवाई आणि ओबीसी समाजाला न्याय मिळू शकतो असे भाजपला वाटते.अलीकडेच ओबीसी नोनिया चौहान समाजाचे दारासिंग चौहान हे देखील भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चा होत होत्या. त्यानंतर दारासिंग चौहान यांनी भाजपात प्रवेश केला.आता पूजा पालची चर्चा जोरात आहे. प्रयागराज लोकसभा मतदारसंघातून पूजा पाल यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. दारासिंह चौहान यांच्याप्रमाणे त्याही विधानसभेचे सदसत्व सोडून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असे वृत्त आहे.अतिक अहमदवर कारवाई झाल्यापासून पूजा पाल भाजपशी जवळीक साधत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
आरपीएफ जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये अधिकाऱ्यासह चार जणांना घातली गोळी
चीपपुरवठ्यात भारत चीनला निश्चित मागे टाकेल
दारूसाठी पाच रुपये कमी दिल्याने दुकानदाराने केलेल्या मारहाणीत एकाच मृत्यू !
त्रिची विमानतळावर ४७ अजगर, २ सरडे घेऊन उतरला प्रवासी !
सपामध्ये येण्यापूर्वी पूजापाल बसपा मधून आमदार झाल्या होत्या. त्यांचे पती राजू पाल हे देखील बसपा मधून विजय झाल्यानंतर विधानसभेत पोहोचले होते.अतिक अहमद याचा भाऊ अशरफ याचा पराभव करून विजयी झाले होते.भावाचा पराभव झाल्याने अतिक अहमदने राजू पाल यांची हत्या केली.तथापि पूजा पाल देखील राजकीय अतिकच्या विरोधात उभी राहिली आणि २००७ मध्ये ती प्रयागराज दक्षिण मतदारसंघातून जिंकली.जेथे तिचे पती राजू पाल एकदा जिंकले होते. अतिक अहमद यांचा पराभव करून त्यांनी निवडणूक जिंकली होती.
मात्र, पूजा पाल यांना २०१७ मध्ये भाजपकडून पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यानंतर २०२२ मध्ये तिने सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. आता तिला फक्त भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे.पाल समाजातील एक मोठा वर्ग भाजपला मतदान करत आहे. मात्र, पूजा पाल यांच्या माध्यमातून भाजप आपली व्होट बँक आणखी मजबूत करेल अशी अपेक्षा आहे.प्रयागराज, कौशांबी आणि प्रतापगढ जिल्ह्यातही पाल समाजाची मोठी लोकसंख्या आहे.मात्र, पूजा पाल यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सांगून समाजवादी पार्टीमध्येच राहणार असल्याचे सांगितले.