श्रीनगर विमानतळावर मोदींना भेटलेल्या ‘त्या’ व्यक्तीची चर्चा

श्रीनगर विमानतळावर मोदींना भेटलेल्या ‘त्या’ व्यक्तीची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर दौऱ्यावर त्यांना श्रीनगर विमानतळावर एका ६० वर्षांच्या व्यक्तीला भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप आनंदित झाले. उपराज्यपाल मनोज सिन्हा, राज्यमंत्री जितेंद्र सिंह, वरिष्ठ अधिकारी उपस्थित असताना या ६० वर्षांच्या सामान्य व्यक्तीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी काढलेले उद्घर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची सिद्ध चौकशी केली. तेव्हा मोदी म्हणाले, आजाद साहेब अआपली मेहनत फळाला आली असे ते म्हणाले.

हेही वाचा..

बोरीवलीतील रिक्षा चालकांचे हे चाललंय काय?

‘सिक्सर किंग’ रोहित शर्माने केली धोनीची बरोबरी

मद्रास उच्च न्यायालयाने जातीसंदर्भातील निकालात केला बदल

अश्विनची १०० नंबरी चमक, भारताने इंग्लंडला गारद करत मालिका जिंकली

पांढरी दाढी, काळा कुर्ता आणि त्यावर भगव्या रंगाची बंडी परिधान केलेल्या या व्यक्तीच्या डोक्यावर तिरंगा असलेली पगडी होती आणि खांद्यावर भाजपचे उपरणे होते. अशफाक आजाद असे त्यांचे नाव आहे. त्यंचे आणि पंतप्रधान मोदी यांचे खूप जुने ऋणानुबंध आहेत. ते त्यांचे मित्र आहेत. आजाद हे बडगाव जिल्ह्यातील हकरमुल्ला गावचे आहेत. मोदी हे अगदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनण्यापूर्वी पासून त्यांची मैत्री आहे. मोदी हे त्यांच्या गावी आणि घरी सुद्धा जाऊन आले आहेत.

जानेवारी १९९२ मध्ये गणतंत्र दिवसाच्या निमित्तने श्रीनगरच्या लालचौकात तत्कालीन भाजपचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांच्या सोबत मोदी हे तिथे तिरंगा फडकवण्यासाठी गलेल होते. त्यावेळी काश्मीरमध्ये दहशदवादी कारवायांचे सत्र सुरु होते. तेव्हा आजाद यांची लालचौक येथे भाजप नेत्यांशी भेट झाली होती. नंतर मोदी यांनी आजाद यांना दिल्लीला बोलावले आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांची भेट करून दिली होती. काही महिन्यानंतर मोदी जेव्हा श्रीनगरमध्ये गेले तेव्हा आजाद हे एक खासगी कार घेऊन स्वतः कार चालवत आपल्या घरी घेऊन गेले होते.त्यावेळी मोदी हे कोणत्याही सुरक्षेशिवाय १० दिवस काश्मीरच्या सर्व जिल्ह्यामध्ये गावागावांचा दौरा केला होता.

Exit mobile version