बदली घ्या किंवा निवृत्ती घ्या…तिरुपती मंदिर ट्रस्टचा अहिंदू कर्मचाऱ्यांसाठी आदेश

बोर्डावरील ३०० कर्मचाऱ्यांना बसणार फटका 

बदली घ्या किंवा निवृत्ती घ्या…तिरुपती मंदिर ट्रस्टचा अहिंदू कर्मचाऱ्यांसाठी आदेश

आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) बोर्डाने सोमवारी (१८ नोव्हेंबर) एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये बोर्डावर नियुक्ती करण्यात आलेल्या बिगर हिंदूंना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास किंवा आंध्र प्रदेशातील अन्य सरकारी खात्यांमध्ये बदली करून घेण्यास सांगण्यात आले आहे. टीटीडी बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष बीआर नायडू यांनी प्रस्तावाची माहिती दिली आहे. मात्र, त्यांनी अहिंदू कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या सांगण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे बोर्डाच्या ७,००० कायम कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. याशिवाय टीटीडीमध्ये असे सुमारे १४ हजार कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष बीआर नायडू म्हणाले की, या निर्णयाला अनेक कर्मचारी संघटनांकडूनही पाठिंबा मिळत आहे. मंदिराचे काम हिंदूंनीच पाहावे, असेही त्यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन

दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था

मतदानावेळी मुस्लिम महिलांचा बुरखा काढून तपास करू नये; सपाचे निवडणूक आयोगाला पत्र

वॉन्टेड नक्षल नेता विक्रम गौडा चकमकीत ठार

गेल्या काही वर्षांत, मंदिर मंडळ आणि त्याच्याशी संलग्न संस्थांनी केवळ हिंदूंनाच काम द्यावे, अशी अट घालण्यासाठी टीटीडीने कायद्यात तीन वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत. माहितीनुसार, १९८९ मध्ये जारी केलेल्या सरकारी आदेशात असेही म्हटले होते की, टीटीडी प्रशासित पदांवर नियुक्त्या केवळ हिंदूंसाठीच मर्यादित असतील. तथापि, या तरतुदी असूनही, बिगर हिंदू संघटनेत काम करत आहेत.

Exit mobile version