टी – २० विश्वचषक स्पर्धेसाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

भारताचा एकमेव सराव सामना १ जून रोजी

टी – २० विश्वचषक स्पर्धेसाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने गुरुवार, १६ मे रोजी आगामी टी २० विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या २० पैकी १७ संघांना सराव सामने खेळण्याची संधी मिळेल. ज्यात दक्षिण आफ्रिका इंट्रा स्क्वॉड सामना खेळेल. तर, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांना सराव सामना खेळण्याची संधी मिळणार नाही. भारताचा एकमेव सराव सामना १ जून रोजी होईल.

हे १६ सराव सामने टेक्सासमधील ग्रँड प्रेयरी क्रिकेट स्टेडिअम, फ्लोरिडातील ब्रोवार्ड काऊंटी स्टेडिअम, क्विन्स पार्क ओवल आणि त्रिनिनाद अँड टोबॅगोमधील ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे रंगतील. हे सराव सामने २०-२० षटकांचे असतील आणि यांना आंतरराष्ट्रीय टी २० सामन्याचा दर्जा मिळणार नाही. यात संघाला त्यांच्या संघातील १५ पैकी १५ खेळाडूंना मैदानात उतरवण्यास परवानगी मिळले. ३० मे रोजी क्विन्स पार्क ओव्हल, त्रिनिनाद अँड टोबॅगोमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा सामना क्रिकेटचाहत्यांसाठी खुला असेल.

हे ही वाचा:

फडणवीसांनी पोलखोलचं केली; अमित शाह, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकं झालेलं काय?

संदेशखालीतील आरोपी शहाजहानच्या निकटवर्तीयांची १४ कोटींची मालमत्ता जप्त!

‘अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्याने माझ्या पोटात मारले, लाथही मारली’

नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिला समाजाला उद्ध्वस्त करत आहेत

सोमवार, २७ मे
कॅनडा विरुद्ध नेपाळ (टेक्सास) सकाळी १०.३० वाजता
ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी (त्रिनिनाद अँड टोबॅगो) दुपारी तीन वाजता
नामीबिया विरुद्ध युगांडा (त्रिनिनाद अँड टोबॅगो) संध्याकाळी सात वाजता

मंगळवार, २८ मे
श्रीलंका विरुद्ध नेदरलँड (फ्लोरिडा) सकाळी १०.३० वाजता
बांग्लादेश विरुद्ध यूएसए (टेक्सास) सकाळी १०.३० वाजता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामीबिया (त्रिनिनाद अँड टोबॅगो) संध्याकाळी सात वाजता

बुधवार, २९ मे
दक्षिण आफ्रिका इंट्रा-स्क्वाड (फ्लोरिडा) सकाळी १०.३० वाजता
अफगाणिस्तान विरुद्ध ओमान (त्रिनिनाद अँड टोबॅगो) दुपारी एक वाजता

गुरुवार ३० मे
नेपाळ विरुद्ध अमेरिका (टेक्सास) सकाळी १०.३० वाजता
स्कॉटलँड विरुद्ध युगांडा (त्रिनिनाद अँड टोबॅगो) सकाळी १०.३० वाजता
नेदरलँड विरुद्ध कॅनडा (टेक्सास) दुपारी तीन वाजता
नामीबिया विरुद्ध पापुआ न्यू गिनी, त्रिनिनाद अँड टोबॅगो, दुपारी तीन वाजता
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, त्रिनिनाद अँड टोबॅगो, संध्याकाळी सात वाजता

शुक्रवार, ३१ मे
आयर्लंड विरुद्ध श्रीलंका, फ्लोरिडा, सकाळी १०.३० वाजता
स्कॉटलँड विरुद्ध अफगाणिस्तान, त्रिनिनाद अँड टोबॅगो, सकाळी १०.३० वाजता

शनिवार, १ जून
बांग्लादेश विरुद्ध भारत, अमेरिकेतील सामन्याच्या ठिकाणाचे नाव जाहीर होणे बाकी

Exit mobile version