26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'टी -२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट'

‘टी -२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट’

वेस्ट इंडिज घेत आहे खबरदारी

Google News Follow

Related

टी -२० विश्वचषक २०२४ ची सुरुवात लवकरच होणार आहे.मात्र याआधी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. टी-२०वर्ल्ड कपवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मिळाली आहे.या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

टी २० वर्ल्ड कप २०२४ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे.१ ते २९ जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे.तत्पूर्वी दहशतवादी हल्ल्याच्या धमकीने चिंता निर्माण झाली आहे.क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाला उत्तर पाकिस्तानमधून टी-२० वर्ल्ड कप सामन्या दरम्यान दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट मिळालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयएस म्हणजेच प्रो इस्लामिक स्टेट वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ल्याचे प्लॅनिंग करत आहे.

हे ही वाचा:

‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; मात्र लोकांना ते विसरायला लावले’

इस्रायलने बंद केले अल जजीराचे कार्यालय!

‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’

लखनऊवर विजय मिळवून कोलकाता अव्वल स्थानी!

टी २० वर्ल्ड कप २०२४ मधील हे सामने वेस्टइंडिजमधील एंटीगा एंड बारबुडा, बारबाडोस, गुयाना, सेंट लूसिया, सेंट विंसेंट एंड ग्रेनेडाइंस आणि त्रिनिदाद एंड टोबैगो येथे होणार आहेत. तर अमेरिकेच्या फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि डलास येथे देखील वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. सेमी फायनलचे सामने त्रिनिदाद आणि गुयाना तर फायनलचा सामना हा बारबाडोस येथे खेळवला जाणार आहे.

दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या धमकीवर क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, यंदा वर्ल्ड कप आयोजित होणाऱ्या देशांमध्ये आणि शहरांमध्ये आम्ही अधिकारायणसोबत मिळून काम करत आहोत. सोबतच यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पूर्ण योजना आखात असून खबरदारी घेत आहोत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा