भारतीय संघ १० डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहे. यंदा भारतीय संघात सलामीवीरांमध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी ज्या खेळाडूंना निवडण्यात आले आहे, त्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील अर्ध्याहून अधिक सलामीवीर आहेत. यातील अनेक जणांनी तर एक-दोनदा सलामीची भूमिका बजावली आहे. १ जानेवारी २०२०पासून आतापर्यंत टी २० सामन्यांत १४ जण सलामीला आले. एकदिवसीय सामन्यांत ११ जण सलामीला आले. तर, कसोटी सामन्यांत सात जण सलामीला आले. म्हणजे या कालावधीत एकूण ३२ जणांनी सलामीवीराची भूमिका बजावली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघामध्ये नवे चेहरेही आहेत. ऋतुराज गायकवाड आता तिन्ही प्रकारच्या खेळांमध्ये खेळताना आढळतील. तर, शुभमन गिल हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत असला तरी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळेल. त्यामुळे २०२४मध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात तीव्र स्पर्धा होईल.
टी २० सामन्यांत सलामीवीर – यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन
एकदिवसीय सामन्यांतील सलामीवीर – ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, केएल राहुल, संजू सॅमसन
कसोटी सामन्यांतील सलामीवीर – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, केएल राहुल
हे ही वाचा:
स्वानंद किरकिरे आणि ‘ऍनिमल’ टीममध्ये जुंपली!
तीन राज्यांत महिलाशक्ती? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महिला होण्याची शक्यता
लग्नात हुंडा मागितल्याने केरळच्या २६ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या!
ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार
१ जानेवारी २०२० पासूनचे टी २० सामन्यांतील १४ सलामीवीर
रोहित शर्मा, केएल राहुल, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, पृथ्वी शॉ
एकदिवसीय सामन्यांतील ११ सलामीवीर
शुभमन गिल, रोहित शर्मा, शिखर धवन, ईशान किशन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, मयंक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, विराट कोहली
कसोटी सामन्यांतील सात सलामीवीर
रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, यशस्वी जयस्वाल, चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ