दागेस्तानमध्ये दहशतवाद्यांचा सिनेगॉग, चर्चवर हल्ला!

१५ जणांचा बळी

दागेस्तानमध्ये दहशतवाद्यांचा सिनेगॉग, चर्चवर हल्ला!

दहशतवाद्यांच्या गटाने रशियातील मुस्लिमबहुल दागेस्तान भागातील दोन सिनेगॉग, दोन चर्च आणि पोलिस चौकीवर हल्ले केले आहेत. डर्बेंट आणि मखाचकला शहरांमध्ये झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात १५ पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बळी पडलेल्यांमध्ये निकोलाई कोटेलनिकोव्ह नावाच्या मुख्य धर्मगुरूचा समावेश आहे. रविवारी, २३ रोजी हा प्रकार घडला.

दागेस्तान पब्लिक मॉनिटरिंग कमिशनचे अध्यक्ष शमिल खादुलाएव यांनी माहिती दिली की, फादर निकोले यांची डर्बेंटमधील चर्चमध्ये हत्या करण्यात आली. त्यांनी त्यांचा गळा चिरला होता. ते ६६ वर्षांचे होते आणि खूप आजारी होते. दहशतवादविरोधी समितीने दिलेल्या माहितीनुसार पलटवारात एकूण ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांनी यापूर्वी पोलीस आणि सुरक्षा दलांवर बंदुका आणि मोलोटोव्ह कॉकटेलने हल्ला केला होता.

हेही वाचा..

भाजपा आमदार मंगेश चव्हाणना धमकी देणाऱ्या जोर्वेकरांविरोधात आंदोलन!

भय्यू नावाने फसवून अर्शदने केला लव्ह जिहाद

पुणे ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेचे दोन पोलीस अधिकारी निलंबित !

नीट परीक्षा घोटाळा लातूर कनेक्शन, चौघांना अटक!

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिज्युअल्समध्ये डर्बेंटमध्ये असलेल्या एका सिनेगॉगला दहशतवाद्यांनी आग लावल्याचे दिसते. मखचकला येथे एक सिनेगॉग आणि पोलिस ट्रॅफिक चौकीवरही हल्ला झाल्याचे दिसते. इस्रायलने दागेस्तानमधील मुस्लिमबहुल प्रदेशातील सभास्थानांना लक्ष्य केल्याचा निषेध केला आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, डर्बेंटमधील सिनेगॉगला आग लावण्यात आली आणि ते जळून खाक झाले. स्थानिक सुरक्षा रक्षक यामध्ये मारले गेले आहेत. मखचकला येथील सिनेगॉगवर गोळीबार करण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळी सिनेगॉगमध्ये कोणीही उपासक नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रशियाने सोमवारपासून या प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, तपास संचालनालयाने माहिती दिली की, रशियन फेडरेशनच्या फौजदारी संहितेअंतर्गत या दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. घटनेची सर्व परिस्थिती आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version