स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी !

उल्लंघन केल्यास ९२ हजार रुपये दंड

स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी !

स्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने बुधवारी बुरख्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर केला. आता स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी तोंड, नाक आणि डोळे झाकणारा मास्क किंवा बुरखा घालता येणार नाही. तरीही कोणी ते घातल्यास ते बेकायदेशीर कृत्य मानले जाईल. तसेच बुरखा किंवा नकाब घातल्यास १००० स्विस फ्रँक म्हणजेच ९२ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

संसदेत १५१ खासदारांनी बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याच्या बाजूने मतदान केले. तर २९ खासदारांनी विरोधात मतदान केले. हे मतदान कनिष्ठ सभागृहात झाले, हे विधेयक वरच्या सभागृहात आधीच मंजूर झाले आहे.स्वित्झर्लंडमधील काही स्त्रिया बुरखा घालून संपूर्ण चेहरा झाकतात, या कपड्याना अफगाणिस्तानमध्ये परिधान केलेले कपडे म्हणून ओळखले जाते.

हे ही वाचा:

मुस्लिम महिलांना आरक्षणात स्थान नसल्यामुळे विधेयकाला ओवैसींचा विरोध !

लष्करी अधिकारी-जवनांमध्ये फूट पाडू नका!

धावत्या टॅक्सिमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार !

खलिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंग याची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या

स्वित्झर्लंडपूर्वी नेदरलँड, फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि बेल्जियम या युरोपीय देशांनी बुरखा आणि नकाबवर बंदी घातली आहे. याशिवाय श्रीलंका आणि चीनने देशात बुरख्यावर बंदी घातली आहे.

स्वित्झर्लंडची एकूण लोकसंख्या सुमारे ८९ लाख आहे. यापैकी ६२.६% ख्रिश्चन आणि ५.४% लोक मुस्लिम आहेत. तर स्वित्झर्लंडमध्ये जवळपास ३० टक्के लोक कोणत्याही धर्माला न मानणारे आहेत.

Exit mobile version