दिल्लीच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी (२० फेब्रुवारी) दिल्लीतील रामलीला मैदानावर पार पडला. भाजप नेत्या रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत परवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंदर सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांच्यासह सहा मंत्र्यांनीही शपथ घेतली. आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनीही रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली. दरम्यान, स्वाती मालीवाल यांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे.
राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी रेखा गुप्ता यांचे मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, “दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ताजींचे खूप खूप अभिनंदन. मला आशा आहे की त्या दिल्लीच्या अपेक्षा पूर्ण करतील.”
हे ही वाचा :
‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ पुस्तकाचे प्रकाशन
ओटीटी प्लॅटफॉर्मना इशारा, आचारसंहितेच्या नियमांचे पालन करा नाहीतर…
२७० किलोचा बार मानेवर पडल्याने १७ वर्षीय पॉवर लिफ्टरचा मृत्यू!
मध्य प्रदेशनंतर आता गोव्यातही ‘छावा’ सिनेमा करमुक्त!
शपथविधी सोहळ्यासाठी रामलीला मैदानावर आल्यावर स्वाती मालीवाल यांनी रेखा गुप्ता यांचे स्वागत केले आणि नंतर कार्यक्रमात त्यांच्यासोबत व्यासपीठ शेअर केले. मालीवाल यांच्यासोबत काँग्रेस नेते देवेंद्र यादव हेही व्यासपीठावर होते. दरम्यान, रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्यांच्या आधी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान, स्वाती मालीवाल ‘आप’ विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या आणि सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर बोलल्या होत्या. दिल्लीच्या विविध भागातील लोकांची भेट घेत त्यांनी तेथील पाणी, रस्ते आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर आम आदमी पक्षाच्या दाव्यांचे वास्तव दाखवले. अरविंद केजरीवाल यांच्यावरही त्यांनी आरोप करत अनेक वेळा निशाना साधला आहे. दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी पक्षाविरुद्ध अनेक वेळा वक्तव्य केले आहे. मात्र, त्या पक्षामधून बाहेर पडलेल्या नाहीत.







