आतिशी यांचे आई-वडील दहशतवादी अफझल गुरूची फाशी रोखण्यासाठी लढले !

स्वाती मालीवाल यांचा आरोप

आतिशी यांचे आई-वडील दहशतवादी अफझल गुरूची फाशी रोखण्यासाठी लढले !

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आलेल्या आतिशी मार्लेना यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी टीका करत मोठा आरोप केला आहे. आतिशी मार्लेना यांच्या आई-वडिलांनी दहशतवादी अफझल गुरूची फाशी रोखण्यासाठी लढले, असे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. तसेच आजचा दिवस दिल्लीसाठी दुःखाचा दिवस असल्याचे म्हटले आहे.

राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये, आतिशी मार्लेना यांच्यासह त्यांच्या आईवडिलांचा देखील एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा रद्द अथवा कमी करण्याचा अधिकार हा केवळ राष्ट्रपतींना असतो. त्यावरून स्वाती मालीवाल यांनी तिच्या पोस्टमध्ये अफझल गुरूची फाशी रोखण्यासाठी आतिशी यांच्या आई तृप्ता वाही यांनी राष्ट्रपतींना पाठवलेले दयेचे पत्रही शेअर केले आहे. यामध्ये तृप्ता वाही यांचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

स्वाती मालीवाल यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, दिल्लीसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद आहे. आज एका महिलेला दिल्लीचे मुख्यमंत्री बनवले जात आहे, जिच्या कुटुंबाने दहशतवादी अफझल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढा दिला. दहशतवादी अफझल गुरूला वाचवण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी माननीय राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज लिहिला. त्यांच्या मते अफजल गुरू निर्दोष होता आणि त्याला राजकीय कटात अडकवण्यात आले होते. आतिशी मार्लेना या फक्त ‘डमी सीएम’ आहेत, तरी हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. देव दिल्लीचे रक्षण करो, असे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

लखनौमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षकालाच पळवून नेले!

जिओचे नेटवर्क गायब; सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या तक्रारी

स्वयंसेवक ते पंतप्रधान… कसा होता नरेंद्र दामोदरदास मोदींचा ७४ वर्षांचा प्रवास?

नागालँड नागरिक हत्या प्रकरण: ३० जवानांवरील फौजदारी खटला रद्द

 

Exit mobile version