कीर्तीचक्र विजेते नायब सुभेदार संतोष राळे यांना स्वा. सावरकर शौर्य पुरस्कार

कीर्तीचक्र विजेते नायब सुभेदार संतोष राळे यांना स्वा. सावरकर शौर्य पुरस्कार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. त्यात शौर्य पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, स्मृतिचिन्ह पुरस्कार, शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार, शिखर सावरकर युवा पुरस्कार, शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण पुरस्कार अशा पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या गुणवंतांना गौरविण्यात येईल. यात कीर्तीचक्र विजेते नायब सुभेदार संतोष राळे यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

२२ मे रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर स्मारकातील सावरकर सभागृहात सायंकाळी ७ वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर असतील तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रुप कॅप्टन, ग्रुप कमांडर निलेश देखणे असतील. स्वा. सावरकर स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर हेदेखील यावेळी उपस्थित असतील. २८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक निर्मित सावरकरांच्या समाजक्रांतिची यशोगाथा (रत्नागिरी पर्व) या माहितीपटाचे लोकार्पण केले जाणार आहे.

हे ही वाचा:

शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक

राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम

जिथे पेट्रोल, तिथे इथेनॉल

आदित्य ठाकरेंच्या धोरणांना उद्धव ठाकरेंचा विरोध?

 

ज्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे, त्यात शौर्य पुरस्काराने नायब सुभेदार संतोष राळे (कीर्तीचक्र) यांना सन्मानित करण्यात येणार असून विज्ञान पुरस्कारासाठी अतुल राणे (संचालक डीआरडीओ), स्मृतिचिन्ह पुरस्काराने वीर सावरकर स्मृती केंद्र, वडोदरा यांना गौरविण्यात येणार आहे.

त्याशिवाय, शिखर सावरकर पुरस्काराने ज्यांना गौरविण्यात येणार आहे, त्यात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ते एव्हरेस्टवीर पद्मश्री सोनम वांग्याल यांना. शिखर सावरकर युवा पुरस्कार देण्यात येणार आहे सुशांत अणवेकर यांना तर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्थेचा शिखर सावरकर पुरस्कार देण्यात येईल रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या रत्नागिरीतील संस्थेला. हे पुरस्कार गेल्या वर्षी जाहीर झाले होते पण करोना संक्रमणामुळे त्यांचे वितरण होऊ शकले नव्हते.

Exit mobile version