स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या २१ गोष्टींचे अभिवाचन

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या २१ गोष्टींचे अभिवाचन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची २८ मे रोजी १३९वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीदिनानिमित्त ‘मुक्तछंद’कडून लहान मुलांसाठी घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथा लहानमुलांना ऐकता याव्यात यासाठी अभिवाचन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवार, ४ जून पासून ही अभिवाचन मालिका सुरू होणार असून यात मंजिरी मराठे यांनी खास लहान मुलांसाठी लिहिलेल्या ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या पुस्तकातील सावरकरांच्या २१ गोष्टींचे अभिवाचन करण्यात येणार आहे. कांचन जोशी या गोष्टींचे वाचन करणार आहेत.

हे ही वाचा:

‘हिंदुत्व धर्म नही इतिहास है’! ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

प्रियांका गांधी दिसणार राज्यसभेत?

जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडली, ७ जवान मृत

वीरप्पन गॅंग फुल फॉर्ममध्ये! मलनिस्सारण विभागात २१ हजार कोटींचा घोटाळा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कर्तुत्वाची ओळख मुलांना व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ हे पुस्तक मंजिरी मराठे यांनी विशेष मुलांसाठी लिहिले आहे. मंजिरी मराठे यांचे वडील श्रीकृष्ण पुरुषोत्तम गोखले हे ३० ते ३२ वर्षे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासोबत होते. त्यामुळे मंजिरी मराठे यांनी त्यांच्या लहानपणी सावरकरांच्या अनेक गोष्टी ऐकल्या. त्यामुळे या कथा लिहिल्याचे मंजिरी मराठे यांनी सांगितलं. या गोष्टींमधून मुलांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version