28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषसावरकर म्हणजे मूर्तिमंत त्याग

सावरकर म्हणजे मूर्तिमंत त्याग

Google News Follow

Related

भारताला स्वतंत्र करण्यासाठी ज्या शूर सेनानीने आपले प्राण पणाला लावले ते आजही त्यांच्या नावाने ओळखले जातात. त्यांचे नाव घेताच छाती अभिमानाने रुंद होते. आजही भारतीय त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतात. असे हे नाव जे भारतीय इतिहासात मोठ्या अभिमानाने घेतले जाते ते म्हणजे “विनायक दामोदर सावरकर” . प्रखर राष्ट्रवाद अखंड उराशी बाळगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी. त्या निमित्त त्यांच्या जीवनातील काही क्षणांचा घेतलेला मागोवा …

लहानपणापासूनच राष्ट्रासाठी काहीतरी करण्याच्या ध्यासाने त्यांना क्रांतिकारी तरुण बनवले. त्याचा मोठा भाऊ गणेश यांचा त्यांच्या वाटचालीत मोलाचा वाटा होता. वीर सावरकर यांना त्यांच्या जीवनात लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल यांसारख्या महान क्रांतिकारक नेत्यांकडून सातत्याने प्रेरणा मिळत राहिली. क्रांतिकारी कार्यांसाठी सदैव तत्पर असलेल्या सावरकर यांनी स्वतःची संघटना तयार केली. याच प्रेरणेतून आपले क्रांतिकारी उपक्रम चालू ठेवत त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पदवी पूर्ण केली. देशाबद्दल समर्पणाची अखंड ज्योत मनात ठेवूनच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सावरकर यांनी महाविद्यालयीन शिष्यवृत्ती मिळवली. शिष्यवृत्तीनुसार त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली.

इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी सावरकर खूप मेहनत घेत होते. पण मनातील राष्ट्रभावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. उत्तर लंडनमध्ये वसतीगृहात राहत असतांना त्यांनी तेथे राहणाऱ्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले. या विद्यार्थ्यांना ब्रिटिश सरकारच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी प्रेरित करतानाच सावरकर यांनी फ्री इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. भारतात परत आल्यावर सावरकरांनी त्यांचा भाऊ गणेश यांच्या सोबत इंडियन काऊन्सिल ऍक्ट १९०९ विरोधात आंदोलन सुरु केले . ब्रिटीश पोलिसांनी विनायक सावरकर यांना गुन्हेगार घोषित केले. गुन्ह्याचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. ही अटक टाळण्यासाठी सावरकर पॅरिसला गेले. मात्र, नंतर १९१० मध्ये सावरकरांना ब्रिटिश पोलिसांनी पकडले. सावरकर यांना गुन्हेगार घोषित करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्यांना मुंबईला सुनावणीसाठी पाठवण्यात आले. सावरकर यांना ५० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी सावरकर यांना ४ जुलै १९११ रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर सेल्युलर जेलमध्ये कैद करण्यात आले. त्या शिक्षेदरम्यान त्यांचा सतत छळाचा सामना करावा लागला पण तरीही त्यांनी हार मानली नाही.

तुरुंगात असतानाही त्यांनी आपल्या हिंदुत्वाचा देशभर प्रसार केला. सावरकर तुरुंगात बसून हिंदुत्व : हिंदू कोण आहे या नावाने वैचारिक लेख लिहायचे आणि गुपचूप तुरुंगाबाहेर कोणाच्यातरी हस्ते वितरण करण्यासाठी पाठवत. हे लेख हळूहळू देशभरात प्रसारित होत गेले. सावरकरांच्या समर्थकांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिला आणि अनेक हिंदूंना हिंदुत्वाकडे आकर्षित करून त्यांना सर्व धर्मांना समान मानणारे भारताचे देशभक्त बनण्याची प्रेरणा दिली. वीर सावरकरांची ६ जानेवारी १९२४रोजी काळ्यापाण्याच्या शिक्षेतून सुटका झाली.

सावरकरांनी भारतात रत्नागिरी हिंदू सभेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. १९३७ मध्ये विनायक सावरकरांची प्रतिभावान प्रतिमा पाहून हिंदू सभेच्या सदस्यांनी त्यांना हिंदू सभेचे अध्यक्ष केले. हिंदू महासभा नंतर राजकीय संघटना बनली. सावरकर भारत-पाकिस्तान फाळणीचे कट्टर विरोधक होते, त्यांना दुभंगलेल्या भारताबद्दल नेहमीच वाईट वाटत असे. राज्याच्या सीमा नद्या, पर्वत किंवा करारांवरून ठरत नाहीत, तर त्या देशातील तरुणांच्या शौर्य, संयम, त्याग आणि शौर्याने ठरतात असे सावरकरांचे फाळणी बाबत ठाम मत होते. १९०४ मध्ये सावरकरांनी अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन केली आणि १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीच्या विरोधात विदेशी कपड्यांची होळी करून ब्रिटिश सरकारच्या या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.

१० मे १९०७ रोजी पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला त्यावेळी सावकरांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेडन्स हे पुस्तक लिहिले. १८५७ ची क्रांती हा विद्रोह नसून पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते हे त्यांनी त्यातून सिद्ध केले. वीर सावरकरांनी त्यांच्या आयुष्यात स्वेच्छा मरणाचे व्रत घेतले होते, त्यामुळे त्यांनी मरेपर्यंत उपवास ठेवणार, तोंडात अन्नाचा कणही ठेवणार नाही, असे सर्वांना आधीच सांगितले होते., आपल्या व्रतानुसार उपवास सुरू करताच सावरकरांनी मृत्यूपूर्वी ही आत्महत्या नाही, आत्मत्याग आहे असा एक लेख लिहिला. . आपल्या व्रतानंतर त्यांनी आपला अन्नत्याग सुरु ठेवला. अखेर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा