स्वातंत्र्यवीर ‘सावरकर’ बॉक्स ऑफिसवर हिट

स्वातंत्र्यवीर ‘सावरकर’ बॉक्स ऑफिसवर हिट

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे यांचा नुकताच प्रदर्शित झालेला बहुचर्तित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धम्माल करताना दिसत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका बखुबीने निभावणाऱ्या रणदीप हुड्डाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाची सुरुवात पहिल्या दिवसापासून या चित्रपटाची धूम पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.१५ कोटींची कमाई केली आहे. याचा अर्थ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात झाली आहे. आता वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल. हा चित्रपट महाराष्ट्राबरोबर उर्वरित राज्यांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

पहिल्याच दिवशी कोटींची कमाई

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने महाराष्ट्रात चांगली ओपनिंग घेतली आहे. शुक्रवारी या चित्रपटाने कोटींची कमाई केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा :

भारत- भूतानमध्ये व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ क्षेत्रातले सामंजस्य करार

टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या संबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून धाडसत्र

दिवाळे गावातील मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई द्या

‘गरज पडल्यास तुरुंगातून सरकार चालवेन’

दिग्दर्शक आणि अभिनेता रणदीप हुडा यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, सहलेखन आणि सहनिर्माते रणदीप हुडा आहेत. अंकिता लोखंडे या चित्रपटात त्यांची पत्नी यमुनाबाई सावरकर यांच्या भूमिकेत दिसली आहे.

Exit mobile version