पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वस्ती अस्तु विश्व’ हा संदेश देत रविवारी G-२० शिखर परिषदेचा समारोप केला.शिखर परिषदेच्या समारोपाच्या वेळी, मोदींनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याकडे G-२० च्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली.शनिवारी नवी दिल्लीत नेत्यांच्या शिखर परिषदेच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ‘जगात शांतता नांदू द्या’ असा संदेश देण्यात आला. हा संदेश G-२० शिखर परिषदेत महत्वपूर्ण मानला जात आहे.
युक्रेनच्या मुद्द्यावर झालेल्या करारावर G-२० वार्ताकारांमध्ये संघर्ष असूनही, G-२० नेते शिखर परिषदेत जमले आणि ‘१०० टक्के सहमतीने’ दिल्ली येथे बैठकीला उपस्थित राहिले.’आजचे युग हे युद्धाचे नसावे’ असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्याचा रोडमॅप आनंददायक असेल. १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. मी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडे G-२० चे अध्यक्षपद सोपवतो, असे पंतप्रधानांनी म्हटले.
हे ही वाचा:
आदित्य एल-१चे पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत पाऊल !
आर्थिक समावेशनाचे ४७ वर्षांचे लक्ष्य ६ वर्षांत पूर्ण
मिर्चीचा ठेचा आणि भाकरी ठाकरेंना पचेल काय ?
आमदार रवींद्र वायकर यांनी तथ्य दडपले!
मुद्द्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी आभासी सत्राचा प्रस्ताव द्या
नोव्हेंबर २०२३ पर्यंत G-२० चे अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे आहे.या दोन दिवसांत तुम्ही अनेक गोष्टी आणि प्रस्ताव मांडले आहेत. जे काही सूचना येतील ते स्वीकारण्याची आणि ते कसे ते पाहण्याची जबाबदारी आमची आहे. त्याबाबत काही होऊ शकते का? याचा विचार होईल. मी नोव्हेंबरच्या शेवटी एका व्हर्च्युअल सत्राचा प्रस्ताव मांडत आहे आणि शिखर परिषदेत चर्चा झालेल्या विषयांचा आढावा घेण्यासाठी व्हर्च्युअल सेशनमध्ये सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
ब्राझीलच्या राष्ट्रपतींचे अभिनंदन:
PM मोदींनी २०२४ मध्ये ब्राझीलच्या राष्ट्रपतींचे त्यांच्या देशाच्या आगामी राष्ट्राध्यक्षपदासाठी अभिनंदन केले. G-२० चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी G-२० ब्लॉकचे कार्यक्षमतेने नेतृत्व केल्याबद्दल आणि या शिखर परिषदेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ब्राझीलला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी दिले.
दरम्यान ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डिसील्वा यांनी म्हटले की, “जेव्हा आम्ही महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो तेव्हा मी खूप भावूक झालो. माझ्या राजकीय जीवनात महात्मा गांधींना खूप महत्त्व आहे. मी अनेक दशके माझ्या संघर्षाच्या काळात, कामगार चळवळीच्या दरम्यान अहिंसेचे पालन केले आहे. त्यामुळेच महात्मा गांधींना आदरांजली वाहताना मी भावूक झालो, असेही ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले.