काशीचा कायापालट करण्यात सरकार, समाज आणि संत समाज यांनी केलेय सामुहिक प्रयात्न केले. स्वर्वेद महामंदिर हे या सामूहिक भावनेचे प्रतीक आहे. हे मंदिर भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतिक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीमधील उमराहा येथे स्वर्वेद महामंदिराचे उद्घाटन केले, यावेळी आयोजी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नरेंद्रनाथ पांडे, सद्गुरु आचार्य श्री स्वतंत्रदेव जी महाराज आणि संत प्रवर श्री विज्ञानदेव जी महाराज उपस्थित होते.
हेही वाचा..
लखनौच्या प्राणीसंग्रहालयातील पाणघोड्याचा क्लिनरवर हल्ला, क्लिनरचा जागीच मृत्यू!
‘चीनला शिकवलेला धडा जिनपिंग कधीही विसरणार नाहीत’
गोरंट्याल फसले; तो सलीम कुत्ता नाही तर सलीम कुर्ला!
तीस साल बाद???? मृत्यूची बातमी की अफवा?
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताने कधीही भौतिक प्रगतीला भौगोलिक विस्तार किंवा शोषणाचे माध्यम बनू दिले नाही. आम्ही आध्यात्मिक आणि मानवी प्रतीकांद्वारे भौतिक प्रगतीचा पाठपुरावा केला. एखाद्या वारशाचा अभिमान न बाळगण्यामागील विचार प्रक्रियेबद्दल दुःख व्यक्त करत, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके दुर्लक्षित राहिलेल्या सोमनाथ मंदिराचे उदाहरण देताना अशा प्रतीकांचे पुनरुज्जीवन केल्याने देशाची एकात्मता अधिक दृढ झाली असती, असे मोदी म्हणाले. यामुळे देशाला न्यूनगंडाच्या भावनेत नेले. आता कालचक्र पुन्हा फिरली आहेत आणि भारत आपल्या वारशाचा अभिमान बाळगत आहे आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा करत आहे. सोमनाथमध्ये सुरू झालेल्या कामाचे आता संपूर्ण मोहिमेत रूपांतर झाल्याचे सांगून त्यांनी काशी विश्वनाथ मंदिर, महाकाल महालोक, केदारनाथ धाम आणि बुद्ध सर्किटचे उदाहरण दिले. गेल्या आठवड्यात दोन वर्षे पूर्ण झालेल्या नवीन काशी विश्वनाथ धाम परिसराने शहरातील अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला नवी गती दिली आहे. आता बनारसचा अर्थ विकास, आधुनिक सुविधांसह विश्वास आणि स्वच्छता आणि परिवर्तन असा आहे. रस्त्यांचे चौपदरीकरण, सहापदरीकरण, रिंग रोड, रेल्वे स्थानकाचे अपग्रेडेशन, नवीन गाड्या, समर्पित मालवाहतूक मार्गिका, गंगा घाटांचे नूतनीकरण, गंगा क्रूझ, आधुनिक रुग्णालये, नवीन आणि आधुनिक दुग्धव्यवसाय, गंगा नदीकाठी नैसर्गिक शेती, तरुणांसाठी प्रशिक्षण संस्था आणि सांसद रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार याला चालना मिळाली असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विहंगम योग संस्थान समाजाच्या सेवेइतकेच आध्यात्मिक कल्याणासाठीही समर्पित आहे”, महर्षी सदाफल देवजी हे योगनिष्ठ संत तसेच स्वातंत्र्यासाठी लढलेले स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये त्यांचे संकल्प पुढे नेण्याची गरज आहे. पाण्याची बचत आणि जलसंधारणाविषयी जागरूकता, डिजिटल व्यवहारांबद्दल जागरूकता, गावे, परिसर आणि शहरांमध्ये स्वच्छतेचे प्रयत्न वाढवणे, स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांचा प्रचार करणे आणि वापर करणे, भारतातील प्रवास आणि शोध, शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीबद्दल जागरुकता वाढवणे, तुमच्या दैनंदिन जीवनात भरडधान्य किंवा श्रीअन्न यांचा समावेश, खेळ, तंदुरुस्ती किंवा योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे आणि भारतातील गरिबी हटवण्यासाठी किमान एका गरीब कुटुंबाला आधार देणे हे संकल्प यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मांडले.