27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषजहांगीरसाठी स्वराची टीव टीव

जहांगीरसाठी स्वराची टीव टीव

Google News Follow

Related

सेलिब्रेटी जोडपे सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. पण या नावावरून सैफ आणि करिना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. पहिल्या मुलाचे नाव क्रुरकर्मा तैमुरच्या नावावरून ठेवल्यानंतर आता दुसऱ्या मुलाचे नाव क्रूर मुघल शासक जहांगीरच्या नावावरून ठेवल्याने सैफ आणि करिनावर टीका होताना दिसत आहे. पण या सगळ्या वादात आता स्वरा भास्करने उडी घेतली आहे.

करिना कपूर खान हिने फेब्रुवारी महिन्यात आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. तेव्हापासूनच सैफ आणि करिनाच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय असणार याची चर्चा रंगू लागली होती. सैफ आणि करिना यांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव तैमुर ठेवले आणि त्यांच्या विरोधात या नावामुळे टीकेची झोड उठली होती. या सर्व पार्श्वभूमीमुळे सैफ-करिनाच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय असणार याची लोकांना फारच उत्सुकता लागली होती.

हे ही वाचा:

भारतात येणार चार नव्या हवाई कंपन्या?

उपग्रह प्रक्षेपणात इस्रोला आले अपयश

अश्विनी उपाध्याय यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत

राज्यात पुन्हा बरसणार जलधारा

अशातच करिना हिने आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहीर केले. करिना ज्याला आपले तिसरे बाळ म्हणते त्या तिच्या पुस्तकातून हे नाव जाहीर करण्यात आले. यातूनच सैफ अली खान आणि करिना कपूरने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर अली खान ठेवले आहे. भारतावर ज्या परकिय मुघल सत्तेने आक्रमण केले त्या मुघल वंशावळीतील जहांगीर एक होता. अशा या जहांगीरचे नाव आपल्या मुलाला दिल्यामुळे करिना चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे.

पण यावरूनच आता स्वरा भास्करनेही टीव टीव केली आहे. ‘एखाद्या दांपत्याने त्यांच्या मुलाचे नाव ठेवल्यावर तुम्ही तुमचे मत व्यक्त करत असाल आणि तुमच्या भावना दुखावत असतील तर तुम्ही जगातील सगळ्यात मोठे गाढव आहात.’ असे ट्विट स्वराने केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा