“आपली हिंदू संस्कृती जपायला हवी, पुढे जायला हवी. आपलं हिंदू राष्ट्र पुढे मोठं झालं पाहिजे,” असं आवाहन ऑलम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याने एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलं आहे. स्वप्नील कुसाळे हा बालेवाडी- हिंजवडीतील अमोल बालवडकर यांच्या दहीहंडीत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले.
स्वप्नील कुसाळे म्हणाला की, “स्पर्धांमुळे अशा उत्सवांमध्ये सहभागी होणे फार कधी जमले नाही त्यामुळे पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आपण सर्वजण जय श्रीराम म्हणतो, घोषणाबाजी करतो. त्या पुढे गेल्या पाहिजेत. हिंदू संस्कृती वाढली पाहिजे. आपण लहान मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणजे आपले हिंदू राष्ट्र आणखी मोठे होईल,” असं मत स्वप्नील याने मांडले आहे.
“दहीहंडी सारखे खेळ खेळण्यासाठी शरीरयष्टी महत्त्वाची आहे. उंचावर जाऊन हंडी फोडणे कौतुकास्पद आहे. त्यामागे मेहनत असते. तरुणांनी चांगला आहार घेतला पाहिजे. बाहेरचे खाऊ नये. घरातील जेवण करावे, वेळेत आणि पौष्टिक खावे,” असेही आवाहन स्वप्नील याने यावेळी खेळाडूंना आणि तरुण वर्गाला केले आहे.
हे ही वाचा..
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू पाच दिवसांच्या पॅरोलवर बाहेर
बंगाल बंद: भाजप नेत्याच्या गाडीवर बॉम्ब, गोळीबाराची घटना !
युपीचे नवे सोशल मिडिया धोरण, देशविरोधी पोस्ट केल्यास ‘जन्मठेप’
मुडा घोटाळ्यानंतर आणखी एक जमीन घोटाळा !
महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत इतिहास रचला. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात चमकदार कामगिरी करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात महाराष्ट्राला ऑलंम्पिक पदक जिंकून देणारा स्वप्नील हा पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी कुस्तीतील पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील रहिवासी असून तो २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.