पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ५० मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या नजरा सध्या स्वप्नील कुसळेवर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ५० मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत दोन कांस्यपदकं जमा झाली आहेत. नेमबाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ही पदकं मिळाली असून आता आणखी एका नेमबाजाने भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसळे हा खेळाडू ५० मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी म्हणजे नेमबाजीत पुरुषांची ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील क्वालिफायर्स पार पडले. या प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

कोल्हापूरचा स्वप्निल कुसळे हा ५० मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. ऑलिम्पिकमधील थ्री पोजिशनिंग ५० मीटर रायफल स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत तो ५९० गुणांसह सातवा आला आहे. त्यामुळे स्वप्निल याने स्पर्धेच्या अंमित फेरीत धडाकेबाज कामगिरी केल्यास भारताच्या खात्यात तिसरं पदक जमा होऊ शकतं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या नजरा सध्या स्वप्नील कुसळे याच्यावर असणार आहेत.

क्वालिफायर्समध्ये स्वप्नील सातव्या क्रमांकावर राहिला. त्याने ५९० गुण मिळवले. याच प्रकारात भारताचा ऐश्वर्य प्राताप सिंग तोमर देखील सहभागी झाला होता. मात्र, त्याला ११ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्वप्नील कुसळे हा गुरुवार, १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता अंतिम फेरीत खेळणार आहे. या स्पर्धेत नेमबाजाला तीन पोजिशन्समध्ये नेम साधावा लागतो. यामध्ये नीलिंग म्हणजेच गुडघ्यावर बसून नेम साधणे, पोटावर झोपून निशाणा साधणे आणि उभा राहून निशाणा साधायचा असतो.

हे ही वाचा:

यूपीएससीकडून पूजा खेडकरांची उमेदवारी रद्द !

पी. व्ही. सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेनचीही पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

‘अरविंद वैश्यच्या हत्येमागे बड्या गँगचा समावेश; उद्धव ठाकरे हे जिहाद्यांचे आका’

हत्येच्या आदल्या दिवशी दाऊद शेख यशश्रीला भेटला, तिचे फोटो अपलोड करण्याची दिली होती धमकी

या प्रकारातून स्वप्नील भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतील तिसरं पदक मिळवून देणार का याकडे लक्ष असणार आहे. यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात नेमबाजीतून दोन पदके आली आहे. मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले. तर, मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी मिळून मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले.

Exit mobile version