महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत इतिहास रचला आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात चमकदार कामगिरी करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात महाराष्ट्राला ऑलंम्पिक पदक जिंकून देणारा स्वप्नील हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी कुस्तीतील पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते.
स्वप्नील कुसाळेंच्या कामगिरीने भारताला तिसरे कांस्य पदक मिळाले आहे. ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात स्वप्नीलने ४५१.४ गुण पटकावत विजय प्राप्त केला. स्वप्नीलच्या विजयाने महाराष्ट्रात एकच जल्लोष करण्यात येत आहे. १९५२ मध्ये अशी कामगिरी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी केली होती. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून दिले होते. अशा कामगिरीने खाशाबा जाधव महाराष्ट्रातील पहिले खेळाडू ठरले होते. खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्नील कुसाळेंनी अशी कामगिरी केली. तब्बल ७२ वर्षानंतर स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी पदक आणले. ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात महाराष्ट्राला ऑलंम्पिक पदक जिंकून देणारा स्वप्नील हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
हे ही वाचा:
अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात होणार वर्गीकरण
आत्मघाती बॉम्बस्फोटाचा तज्ज्ञ खालेद होणार हमासचा प्रमुख !
मुस्लिम मतांमुळे फडणवीसांवर टीका करण्यासाठी उद्धव ठाकरेंना आला जोर !
अभेद्य बचावात्मक खेळीसाठी ओळखले जाणारे क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन
स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील रहिवासी असून तो २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. अखेर त्याच्या महेनतीला यश मिळाले. स्वप्निलच्या या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी सर्वांनी एकच जल्लोष केला. देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.