22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषस्वप्ना पाटकर यांनी केली संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार!

स्वप्ना पाटकर यांनी केली संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार!

भाजपाकडूनही चौकशीची मागणी

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.डॉ.स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

व्यंकटेश मरिअप्पा उप्पर हा आरोपी हरवला असून संजय राऊत यांनी याला गायब केला आहे, असा आरोप डॉ.स्वप्ना पाटकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.व्यंकटेशवर हेरगिरी केल्याचा आरोप पाटकर यांनी केला होता.अजामीनपात्र वॉरंट जारी करून देखील दोन वेळा व्यंकटेश कोर्टात गैरहजर राहिला.व्यकंटेशच्या गैरहजेरीमुळे त्याचे काही बरे वाईट झाले असावे असा संशय पाटकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा.. 

बलुचिस्तानमधून महिन्याभरात २२ जणांचे अपहरण

पाठ्यपुस्तकातून बाबरीचा ‘ढाचा’ हटवून अयोध्येचे राममंदिर!

‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा!

राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये मुस्लिम लीगच्या भीतीने काँग्रेसचेही झेंडे गायब?

यावरून स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.संजय राऊत यांच्या विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.डॉ.स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीच्या आधारे भाजपने देखील चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, डॉ. स्वप्ना पाटकर या महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार आहेत.तसेच संजय राऊत यांच्या जवळचे नेते सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत.संजय राऊत यांनी छळ केल्याचा, धमकी दिल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केला आहे.स्वप्ना पाटकर यांनी २०२१ मध्ये संजय राऊत यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत हे आठ वर्षांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा