खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांना आणखी एक धमकी आली आहे. एका अज्ञात इसमाकडून बुधवारी त्यांना धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात पाटकर यांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, कलिना, सांताक्रूझ येथील त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये मध्यरात्री १.१२ वाजता एक दारुची बाटली फुटल्याचा आवाज झाला. तेव्हा पाटकर यांचे अंगरक्षक अनिरुद्ध पाटकर यांनी कंपाउंडमध्ये काय फुटले याची पाहणी केली तेव्हा त्या फुटलेल्या बाटलीच्या झाकणात एक चिठ्ठी असल्याचे लक्षात आले. त्या चिठ्ठीत स्वप्ना पाटकर यांना धमकावण्यात आले होते. त्यात लिहिले आहे की, फार फडफड करून झाली तुझी. तुझा दादा टरबुज्याला आता दिल्लीला फेकणार मग कोण वाचवणार तुला. कोर्टात आवाज करू नको. काम, बँक, जगणे सगळे ब्लॉक केले तरी तुझा माज जात नाही. आता फुल ब्लॉक.
यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली असून आता पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात मनीलाँड्रिंग प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. त्यांच्या तक्रारीवरून राऊतांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आपल्याला धमकी मिळत असल्याची तक्रारही त्यांनी त्यावेळी केली होती. ईड़ीलाही त्यांनी याच मनीलॉन्ड्रिंग प्रकरणात जबाब बदलण्यासाठी स्वप्ना पाटकर यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता, असाही दावा त्यांनी केला होता.
हे ही वाचा:
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!
संगमनेर कारागृहातून चार कैद्यांचे पलायन!
एल्विश यादव प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर!
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांच्या मागे लागणार मधमाशा!
गेल्या वर्षी त्यांच्या घरी वर्तमानपत्रातून एक धमकीचे पत्रही आले होते. त्यात हत्येची, बलात्काराची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्याविरोधात ५०४, ५०६, ५०९ही कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर यांच्या स्वप्ना या पत्नी आहेत. त्यांच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या शब्दांत संजय राऊत यांनी वक्तव्य केलेली एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. संजय राऊत यांच्याकडून गेली ८ वर्षे त्रास दिला जात असल्याचा आरोपही स्वप्ना पाटकर यांनी केलेला आहे.
सरकार कारवाई करणार का?
स्वप्ना पाटकर यांनी या सगळ्या तक्रारी केलेल्या असल्या तरी त्यासंदर्भात पोलिस तसेच प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. आताही नव्याने ही धमकी दिली गेली असली तरी त्यावर काही कारवाई होणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काही कारवाई करणार का, असा सवाल त्या उपस्थित करतात.
स्वप्ना पाटकर या सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार २००७मध्ये त्यांची संजय राऊत यांच्याशी भेट झाली होती. त्यांनी पाटकर यांना व्यवसायात भागीदार होण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण स्वप्ना यांनी नकार दिल्यानंतर त्यांना त्याचा राग आला.