स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची कमाई ११ कोटी पार

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची कमाई ११ कोटी पार

रणदीप हुडाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यात रणदीप हुडा मुख्य भूमिकेत आहे. रणदीप हुडाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडत चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटातील रणदीपच्या शानदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पहिल्या दिवशी दीड कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने वेग घेतला आणि सव्वादोन कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाला रविवारचा फायदा मिळाला आणि चित्रपटाने २.७५ कोटींचा व्यवसाय केला. होळीच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने सव्वा दोन कोटींची कमाई केली आहे. या चार दिवसात या चित्रपटाने ११ कोटींची घसघशीत कमाई केलेली आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ११ कोटींचा व्यवसाय केला याची माहिती रणदीप हुडा यांनी ट्वीटवर हँडलवरून दिलेली आहे.

मोशन पिक्चर्स आणि लीजेंड स्टुडिओजच्या बॅनरखाली आनंद पंडित यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची निर्मिती केली आहे. रणदीप हुडा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून रणदीप हुड्डाने वीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. अंकिता लोखंडे देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. यात ती वीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई यांची भूमिका साकारत आहे.

रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्याचबरोबर विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारणारा तो या चित्रपटाचा मुख्य अभिनेताही आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्याने ३२ किलो वजन कमी केले होते. हा चित्रपट २२ मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल झाला असून तो चांगला प्रदर्शन करत आहे.

हेही वाचा :

‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण

पुतिन म्हणतात, मॉस्को हल्ल्यामागे ‘कट्टरपंथी इस्लामवादी’

आरोग्य विभागासाठी अरविंद केजरीवालांनी ईडीच्या कोठडीतून काढला दुसरा आदेश

‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाने पहिल्या दिवसापासून चांगली कमाई केली आहे. वीकेंडला रणदीप हुडाच्या चित्रपटाचे कलेक्शन ११ कोटींच्या घरात पोहोचली आहे. या चित्रपटाचे बजेट केवळ २० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version