‘स्वच्छ भारत मिशन’च्या दशकपूर्तीला मोदींनी लोकसहभागाची घेतली दखल!

पंतप्रधान मोदींनी जनतेला केले संबोधित

‘स्वच्छ भारत मिशन’च्या दशकपूर्तीला मोदींनी लोकसहभागाची घेतली दखल!

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर देशाच्या आणि नागरिकांच्या हितासाठी अनेक उपक्रम चालू करण्यात आले. यातील एका उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारने चालू केलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आज (२ ऑक्टोबर) दिल्लीतील विज्ञान भवन येथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाला संबोधित करताना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आणि स्वच्छतेसाठी झटलेल्या लोकांची आठवण करून देत, स्वच्छता मोहिमेसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, एक म्हाताऱ्या आईने आपल्या घरातील बकरी विकून शौचालय बांधण्याच्या मोहिमेत सामील झाली. काहींनी आपले मंगळसूत्र विकले, तर कोणी शौचालय बांधण्यासाठी जमीन दान केली. निवृत्त शिक्षकाने आपली पेन्शन दान केली. तर कुठे जवानाने निवृत्तीनंतर मिळालेले पैसे स्वच्छतेसाठी समर्पित केले.

हे ही वाचा : 

इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करून चूक केलीये, आता परिणाम भोगा

हिजबुल्ला- इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारतीयांसाठी ऍडवायजरी

खासदार सुनील तटकरेंना घ्यायला पुण्यातील दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने केले होते उड्डाण

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू

ते पुढे म्हणाले, जर हे दान कोणत्या मंदिरासाठी दिले असते, किंवा कोणत्या अन्य समारोहात दिले असते, तर कदाचित वृत्तपत्रात पहिल्या पानावर त्यांच्या नावाची बातमी असती आणि सर्व ठिकाणी त्याची चर्चा झाली असती. पण देशाला माहिती पाहजे की, ज्यांचा चेहरा टीव्हीवर कधी चमकला नाही, ज्यांचे नाव वृत्तपत्रावर कधी छापले नाही, अशा लक्षावधी लोकांनी काहीना-काही दान करून ते वेळेचे दान असो अथवा संपत्तीचे दान असो, या आंदोलनला एक ताकद दिली आहे, उर्जा दिली आहे आणि हे माझ्या देशाच्या चरित्र्याचा परिचय करून देत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version