ओडिशातील बालासोर शहरात बकरी ईदला तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे इंटरनेट बंद करून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, बकरी ईद दिवशी गायींचा बळी दिल्याचा परिसरातील काही मुस्लिम समाजातील नागरिकांवर आरोप आहे, त्यामुळे हिंदू समाजातील लोक संतप्त झाले आहेत. या कारणावरून सोमवारी (१७ जून) दुपारच्या सुमारास दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आल्याने तेथे हाणामारी झाल्याची घटना घडली.
बालासोर शहरातील पत्रपाडा भागात ही घटना घडली, हा संमिश्र लोकवस्तीचा भाग आहे. काही स्थानिक लोकांनी नाल्याचे पाणी लाल झाल्याचे पाहिले अन त्यांना शंका आली की कदाचित हे जनावरांचे रक्त असावे. त्याच दरम्यान, एका गायीचा बळी दिल्याची चर्चा रंगली. यावरून हिंदू समाजाने संताप व्यक्त केला. काही वेळातच हिंदू आणि मुस्लीमांचा जमाव समोरासमोर आला आणि दगडफेक सुरु झाली. या घटनेत ५ पोलिसांसह १५ जण जखमी झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहता जिल्हाप्रशासनाने परिसरात कलम १४४ लागू केले.
हे ही वाचा:
गायिका अलका याग्निक यांच्या श्रवणशक्तीवर व्हायरल अटॅक, आवाज येणं झालं बंद!
पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत उकळले ५० लाख रुपये
राजस्थानमधून रामललासाठी एक अनोखी भेट, पंच धातूपासून बनविलेले धनुष्य, बाण आणि गदा पोहोचली अयोध्येत!
मोबाईलमुळे ईव्हीएम हॅक होते हे सिध्द करून दाखवा
एका समाजातील काही लोकांनी दुसऱ्या समाजातील लोकांच्या घरावर दगड, काठ्या आणि काचेच्या बाटल्यांनी हल्ला केला. तसेच भागातील अनेक वाहने जाळण्यात आली. बदमाशांच्या जमावाने लोकांवर दगडफेक करत घरांना आग लावण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.
या संदर्भात बालासोरचे एसपी सागरिका नाथ म्हणाले की, बालासोरच्या शहरी भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अफवा रोखण्यासाठी परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. हाणामारीत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.