विशाळ गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती !

मुंबई हाय कोर्टाचे आदेश

विशाळ गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती !

विशाळ गडावरील अतिक्रमणाविरोधात सुरु करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई हाय कोर्टाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पावसाळ्यात अतिक्रमणाविरोधात कारवाई कशाला? असा सवाल मुंबई हाय कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे.

विविध हिंदू संघटना आणि शिवभक्तांच्या मागणीनंतर प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेल्या गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाई आता ब्रेक लावण्यात आला आहे. गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला मुंबई हाय कोर्टाने स्थगिती दिली आहे. भर पावसात गडावरील अतिक्रमणाविरोधात कारवाई कशाला, असा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विशाळगडावरील कारवाई तातडीने थांबवण्याचे निर्देशही दिले.

हे ही वाचा:

नोकऱ्यामधील आरक्षणावरून बांगलादेशात हिंसाचार

पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिलेल्या पत्त्यावरील खेडकर कुटुंबियांची कंपनी अनधिकृत!

पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याबद्दल इटालियन पत्रकाराला ४.५ लाखांचा दंड

आता जरांगेंचा तोल पूर्ण सुटलाय!

विशाळ गडावर तोडफोड प्रकरणी स्थानिकांनी याचिका दाखल केली होती. तोडफोडीचे व्हिडिओ याचिका कर्त्यांनी कोर्टात सादर केले. त्यानंतर हाय कोर्टाने निर्णय घेत गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला तात्काळ स्थगिती दिली आहे. सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई नको, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Exit mobile version