25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषबारामतीमधील ‘त्या’ विमान अपघातानंतर कंपनीवर निलंबनाची कारवाई

बारामतीमधील ‘त्या’ विमान अपघातानंतर कंपनीवर निलंबनाची कारवाई

DGCA कडून अपघाताची दखल

Google News Follow

Related

बारामतीमध्ये प्रशिक्षणादरम्यान झालेल्या विमान अपघाताप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या अपघाताची नोंद DGCA (Directorate General of Civil Aviation) ने घेतली असून कंपनीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या विमानाच्या अपघातांची गंभीर दखल घेत रेडबर्ड एव्हिएशनवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत कंपनीने देशभरातील आपले कामकाज बंद करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

बारामतीत बारामती विमानतळावरील रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटर अकॅडमीकडून शिकाऊ पायलटला विमान प्रशिक्षण देण्यात येते. मागच्या सहा महिन्यात पाच अपघात तर पंधरा दिवसात दोन वेळा अपघात झाल्याने या कंपनीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. देशभरातील रेड बर्ड संस्थेचे कामकाज तात्काळ निलंबित करण्यात यावे, असे आदेश सिव्हिल एव्हिएशनचे डायरेक्टर फोर फ्लाईंग ट्रेनिंग कॅप्टन अनिल गिल यांनी दिले आहेत.

रेड बर्ड कंपनीच्या एका विमानाचा अपघात झाल्याची नोंद डीजीसीए यांनी घेत ही कठोर कारवाई केली आहे. या संदर्भात रेडबर्ड कंपनीला ई-मेल पाठवून तातडीने कामकाज पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

तृणमूल पक्षाचे महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाईचे संकेत

कर्नाटकमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मुस्लीम विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास काँग्रेस सरकारची परवानगी

गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली

बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!

बारामती येथील कटफल येथे वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. गेल्या काही दिवसापासून जोरदार प्रशिक्षण सुरू होते. अशातच काही दिवसांपूर्वी ट्रेनिंग सुरु असताना एक विमान कोसळलं. या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग जखमी झाले. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवाय स्थानिक नागरिकही अपघातस्थळी दाखल झाले होते. या अपघातात विमानाचं मोठं नुकसान झालं मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा