जैसलमेरमधून संशयित पाकिस्तानी हेराला अटक!

लष्कराला गुप्त माहिती पाठवल्याचा संशय

जैसलमेरमधून संशयित पाकिस्तानी हेराला अटक!

राजस्थानमधील जैसलमेर येथून एका संशयित पाकिस्तानी हेराला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांनी जैसलमेरच्या मोहनगड कालवा परिसरातून आरोपीला पकडले आहे. पठाण खान असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो जैसलमेरचा रहिवासी आहे. या तरुणावर भारतीय गुप्तचर माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा संशय आहे.

गुप्तचर यंत्रणांनी मोहनगड पोलिस ठाण्यासोबत मिळून जैसलमेरच्या कालवा परिसरातील झिरो आरडी येथून पठाण खानला अटक केली. पठाण खानची आता चौकशी केली जात आहे. तसेच, पाकिस्तानला पाठवलेल्या गुप्तचर माहितीची चौकशी पथक करत आहे.

विशेष म्हणजे, अटकेतील पठाण खान याचे नातेवाईक पाकिस्तानात राहतात. २०१९ मध्ये पठाण खाननेही पाकिस्तानला भेट दिली होती. तेव्हापासून तो सतत पाकिस्तानच्या संपर्कात होता आणि सुरक्षा यंत्रणाही त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पठाण खान बऱ्याच काळापासून पाकिस्तानी गुप्तहेरांना लष्करी क्षेत्राचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पाठवत आहे.

हे ही वाचा : 

अवैध मदरसांवर सरकारच्या कारवाईला बोर्डचा पाठिंबा

काँग्रेसने आपला अजेंडा आणि झेंडा मुस्लिम लीगच्या कार्यालयात सरेंडर केला

कुणाल कामराला पुन्हा खुमखुमी, नवे गाणे केले पोस्ट

भारतात दुध उत्पादनात १० वर्षांत ६३.६ टक्के वाढ

पाकिस्तानला गुप्तचर माहिती पाठवल्याच्या संशयावरूनच सुरक्षा यंत्रणा आणि मोहननगर पोलिस ठाण्याने संयुक्त कारवाई करत पठाणला काल रात्री ३ वाजता त्याच्या शेतातून अटक केली. पथकाकडून त्याची सध्या चौकशी सुरु आहे, त्याचा मोबालही जप्त करण्यात आला असून तपासणी सुरु आहे.

इंद्रजित सावंत कुत्र्याच्या मागे का लागलेत ? | Mahesh Vichare | Indrajit Sawant | Waghya Kutra |

Exit mobile version