ड्रग्स माफिया ललित पाटील याचा एनकाऊंन्टर होऊ शकतो अशी शक्यता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. तसेच ससून रुग्णालयावर ऑपरेशनची वेळ आली आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. संजीव ठाकूर यांनी नार्को टेस्ट करुन त्यांना सहआरोपी करा, अशी मागणीही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.
ड्रग्स माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित नव-नवीन माहिती समोर येत आहे. ड्रग्स प्रकरणी मंत्री दादा भुसे त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांचा संबंध असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता. त्यानंतर आता थेट ललित पाटीलचा एनकाऊंन्टर होऊ शकतो अशी शक्यता ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारेंनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?
‘अल जझिराचे युद्धावरील वृत्तांताचे प्रमाण कमी करा’
हमासच्या चुकीचा फटका गाझातील पत्रकाराला बसला; इस्रायलच्या बॉम्बवर्षावात कुटुंब मृत्युमुखी
कतारने ठोठावली भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा!
या प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारे यांनी गृहखात्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाले की, जे काम गृहखात्याने करायला हवं, मात्र ते काम पत्रकार करत आहेत. आम्ही सातत्याने याबाबत बोलत होतो. ससूनचे डीन संजीव ठाकूर ललित पाटीलवर उपचार करत होते .ससूनच्या डीनची नार्को टेस्ट करा. ससूनच्या डीनवर कुणाचा वरदहस्त आहे. हे लगेच कळेल. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करण्यात यावे. त्यांनी बोगस उपचार केले. हर्नियाच्या ऑपरेशनला ५ महिने लागतात मात्र एवढे ९ महिने कशासाठी ससूनमध्ये ठेवण्यात आलं?, संजीव ठाकूरवर फार मोठा राजकीय वरदहस्त आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे म्हणाल्या की, संजीव ठाकूर एक खोटं बोलण्यासाठी १०० खोटं बोलत आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याची गरज आहे. शिवाय ललित पाटील हा शिवसेनेत काम करत होता. त्यावर त्यांना विचारलं असता. तो कोणत्या पक्षात होता, यामुळे त्याचा गुन्हा माफ होत नाही.त्या जेलच्या कारागृह अधीक्षक होते ते नेमकं काय करत होते, असाही प्रश्न अंधारेंनी उपस्थित केला.