सुशील कुमारचे नोकरीतून निलंबन

सुशील कुमारचे नोकरीतून निलंबन

खूनाच्या आरोपात अटकेत असलेल्या ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे. सुशील कुमार याला झालेल्या अटकेनंतर उत्तर रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता जोपर्यंत सुशीलच्या न्यायालयीन खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुशील कुमार हा निलंबित असेल.

भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला खूनाच्या आरोपात दिल्ली पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या एका वादात तरुण कुस्तीपटूच्या हत्येचा ठपका सुशील कुमार ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात सुशील कुमार सोबतच त्याचा एक साथीदारही अटकेत आहे. या दोघानांही न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सुशील कुमारला नोकरीतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सुशील कुमारची ऑलिम्पिक पदकेही काढून घेतली जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचा तुघलकी निर्णय, १३०० कंत्राटी डॉक्टरांना केले सेवामुक्त

नालेसफाईचा दावा फोल, टक्केवारीच्या कारभाराचे भाजपाकडून पोस्टमार्टम

शिवसेनेची झाली सोनिया सेना

शिवसेना आमदाराच्या कार्यालयातूनच मद्य वाटप

काय आहे प्रकरण?
४ मे रोजी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम येथे सागर धांकड या युवा कुस्तीगीराला मारहाण करण्यात आली होती. त्यातच सागर याचा मृत्यू झाला होता. सागरला झालेल्या मारहाणीत त्याला झालेल्या जखमांमुळेचे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. तर या प्रकरणात सुशील कुमार आणि इतर सहा जण हे मुख्य आरोपी आहेत. सागरच्या हत्येनंतर हे आरोपी फरार झाले होते. त्यांचा शोध दिल्ली पोलीस घेत होते. सुशील कुमारला पकडून देणाऱ्यांना तर पोलीसांनी एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. अखेर सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन अटक केली.

Exit mobile version