सुशिकला आगाशे, मयुरी लुटे भारतीय संघात

सुशीकला आणि मयुरी या दोघींची २०२३ या वर्षातली ही पाचवी आंतरराष्ट्रीय स्पर्धा

सुशिकला आगाशे, मयुरी लुटे भारतीय संघात

हँगझाऊ, (चीन) येथे २३ सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सुशिकला दुर्गाप्रसाद आगाशे आणि मयुरी धनराज लुटे यांची ट्रॅक सायकलिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. १४ पुरुष आणि ४ महिला असा १८ सायकलपटूंचा भारतीय संघ उद्या दिनांक २२ सप्टेंबर रोजी चीनकडे रवाना होत आहे.

 

सुशीकला आणि मयुरी या दोघींची २०२३ या वर्षातली ही पाचवी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या वर्षात सुशीकला आणि मयुरीने आत्तापर्यंत जकार्ता (इंन्डोनेशीया) आणि कैरो (इजिप्त) येथे अनुक्रमे फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये झालेल्या ‘युसीआय’ नेशन्स कप ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत भारतातर्फे सहभाग घेतला होता.

 

हे ही वाचा:

शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!

छोटा राजनचा नवा अवतार, लॉरेंस बिश्नोई…

शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!

ओंकारेश्वरला उभी राहिली आदि शंकराचार्यांची भव्य मूर्ती !

मलेशिया येथे १४ ते १९ जुन दरम्यान झालेल्या एशियन ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत या दोघींनी भारताचे प्रतिनीधीत्व केले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये तैवान येथे झालेल्या ट्रॅक इंटरनॅशनल स्पर्धेत या जोडीने भारताकडून खेळताना दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले.

 

 

भंडारा जिल्ह्यामधील निलज-खुर्द (ता. मोहाडी) येथील सुशिकला आणि बेला (ता. भंडारा) योथील मयुरी या दोघी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन असून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेमध्ये निवड झाली तेव्हा वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना साधी सायकल चालवता येत नव्हती. त्यांनी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दीपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग खेळाचे प्राथमिक धडे गिरवले. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि सब – ज्युनिअर वयोगटातील कामगिरीवरुन दोघींची निवड नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अकॅडमीसाठी झाली. गत ८ वर्षांपासून या दोघी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अकॅडमीमध्ये सराव करत आहेत.

 

 

 

या एशियन गेम्स् साठी एमटीबी प्रकारात महाराष्ट्राची संगमनेरची प्रणीता सोमण आणि नाशीकची ऋतिका गायकवाड यांची निवड झाली होती पण केंद्र सरकारने एमटीबी संघास आयत्यावेळी परवानगी नाकारली. या स्पर्धेसाठी जाणारा भारतीय महिला संघ पुढीलप्रमाणे: क्लेस्टीना (तामिळ नाडू), त्रिशा पॉल (प. बंगाल), मयुरी धनराज लुटे, सुशिकला दुर्गाप्रसाद आगाशे (दोघी महाराष्ट्र).

Exit mobile version