28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेष‘सुशासन पर्व’ वाचनीय दिवाळी अंक!

‘सुशासन पर्व’ वाचनीय दिवाळी अंक!

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली पावती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दशकांच्या प्रशासकीय कारकीर्दीवर बेतलेला ‘सुशासन पर्व’ हा दिवाळी अंक ‘न्यूज डंका’ने प्रकाशित केला आहे. या अंकाची मराठी आणि हिंदी प्रत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या अंकात लोककल्याणाची दोन दशके हा लेख लिहिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या दिवाळी अंकाचे कौतुक केले. तो वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रियाही दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान ही गेल्या २० वर्षांची जी प्रदीर्घ राजकीय, प्रशासकीय वाटचाल केली आहे, त्याचा सम्यक आढावा या अंकातून घेण्यात आला आहे.

अनेक मान्यवरांनी आपल्या लेखांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या या कारकीर्दीतील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी तर आपले विचार मांडले आहेतच, पण भाऊ तोरसेकर, डॉ. शैलेंद्र देवळाणकर, ले. जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर, उदय माहुरकर, मिलिंद कांबळे, रणजित सावरकर, डॉ. सत्यजित देशपांडे, डॉ. अंशू जोशी, डॉ. जयश्री तोडकर, चंपतराय, अंजली भागवत, डॉ. तुषार सावडावकर, ‘न्यूज डंका’चे संपादकीय सल्लागार अतुल भातखळकर, मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी विविध विषयांना स्पर्श करत पंतप्रधान मोदी यांच्या या यशस्वी कारकीर्दीचे विविध पैलू टिपलेले आहेत.

हे ही वाचा:

दिवाळीनिमित्त मुस्लिम महिलांनी केली राम आरती

सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी

लोकवाड्मयगृहचे प्रकाशक प्रकाश विश्वासराव यांचे निधन

सामान्य नागरिकांना त्रास न देता मोदींचा निघाला ताफा! झाले कौतुक…

कारुळकर प्रतिष्ठानचे प्रशांत कारुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अंकाची निर्मिती करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा