प्रसिद्ध झाला!! ‘न्यूज डंका’चा पहिलावहिला दिवाळी अंक ‘सुशासन पर्व’

प्रसिद्ध झाला!!  ‘न्यूज डंका’चा पहिलावहिला दिवाळी अंक ‘सुशासन पर्व’

मराठी माणसासाठी दिवाळी म्हणजे चुरचुरीत, खुसखुशीत, खमंग फराळ, दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, विविध रंगांची उधळण असलेली रांगोळी आणि अर्थातच दिवाळी अंक. ‘राष्ट्रवादाचा बुलंद आवाज’ असलेला आपला लाडका ‘न्यूज डंका’ घेऊन आला आहे आपला पहिलावहिला दसरा-दिवाळी अंक ‘सुशासन पर्व’! शनिवार, ३० ऑक्टोबर रोजी ‘न्यूज डंका’ चे सल्लागार संपादक आमदार अतुल भातखळकर, मुख्य संपादक दिनेश कानजी आणि ‘न्यूज डंका’ चे मार्गदर्शक प्रशांत कारुळकर यांच्या हस्ते मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘न्यूज डंका’ च्या बोरीवली येथील कार्यालयात हा प्रकाशन सोहळा पार पडला.

‘न्यूज डंका’ च्या या दसरा-दिवाळी अंकात वाचकांसाठी दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण लेखांची मेजवानी असणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दिग्गज मंडळींनी या अंकासाठी लिखाण केले आहे. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा या अंकातून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच संसदीय राजकारणात २० वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. या दोन दशकांच्या कामगिरीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण या दिवाळी अंकात वाचायला मिळणार आहे.

‘न्यूज डंका’चे मुख्य संपादक दिनेश कानजी आणि सल्लागार संपादक अतुल भातखळकर यांच्या सह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, केंद्रीय मंत्री भारती पवार, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, उदय माहूरकर, रणजीत सावरकर, ऑलिम्पिकपटू अंजली भागवत, चंपत राय, नितीन गोखले, डॉ.निलीमा क्षीरसागर अशा अनेक धुरंदरांचे लेख असणार आहेत. या दिवाळी अंकाच्या निर्मितीमध्ये ‘न्यूज डंका’ चे मार्गदर्शक असणारे प्रशांत कारूळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

हे ही वाचा:

परमबीर गेले बेल्जियमला?

‘कुणाचा नवरा हिंदू की मु्स्लिम याचे नवाब मलिक आणि मीडियाला काय देणेघेणे?’

‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’

जो जितेगा वही सिकंदर

 

या दसरा दिवाळी अंकाचे स्वागत मूल्य हे मात्र १००० रुपये आहे. (टपाल खर्च वेगळा आकारला जाईल) आपण newsdanka@gmail.com या ईमेल वर अथवा ९९६७७७२०००/ ८४४६१४६०४६ क्रमांकावर संपर्क साधून अंक नोंदवू शकता. तेव्हा त्वरा करा…आपला अंक आजच नोंदवा!

Exit mobile version