30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषट्विटरवर सुशांत सिंह राजपूत ट्रेंडिंग

ट्विटरवर सुशांत सिंह राजपूत ट्रेंडिंग

Google News Follow

Related

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडियावर त्याच्या नावाने ट्रेंड सुरु झाला आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या साऱ्या सोशल प्लॅटफॉर्म्सवर सुशांत सिंह राजपूतचे चाहते त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. तर अनेक जण हे सुशांत सिंह राजपूतसाठी न्याय मागत आहेत. ट्विटरवर #SushantSinghRajput आणि #Insaaf4SSR हे दोन हॅशटॅग्स भारतात सगळ्यात जास्त ट्रेंड होत आहेत.

एक वर्षांपूर्वी १४ जुन २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत या प्रतिभावान अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आली आणि सारा देश शोकाकुल झाला. सुरवातीपासूनच सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू हा संशयास्पद ठरला. प्रथमदर्शनी सुशांतच्या मृत्यूचे कारण हे आत्महत्या दिसत असले तरीही त्याला जोडून इतर अनेक संशयास्पद गोष्टी समोर येत आहेत. सुशांतला आत्महत्येसाठी कोणी प्रवृत्त केले का? त्याला ड्रग्स दिले जात होते का? चित्रपटसृष्टीतील कंपूशाहीचा तो बळी ठरला का? असे अनेक सवाल सुरवातीपासूनच उपस्थित होत आहेत.

हे ही वाचा:

चिराग पासवान यांना मोठा धक्का

उल्हासनगर प्रकरणी बिल्डरवर महिन्याभराने गुन्हा 

जोकोविच सितसी’पास’; १९ वे ग्रँडस्लॅम जिंकले

भ्रष्टाचारांची मालिका हीच का ठाणे महापालिका? राहुल घुले प्रकरणावरून भाजपाचा सवाल

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आज वर्ष लोटले तरीही त्या मागचे गूढ अजूनही उलगडलेले नाही अशी लोकभावना आहे. त्यामुळेच सुशांत सिंह राजपूत याला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी नेटकरी करताना दिसत आहेत. या संबंधीचे ट्विट्स पाहायला मिळत आहेत. यात सामान्य नेटकऱ्यांपासून ते नितेश राणेंसारख्या राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.

नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये असे म्हटतात की न्यायासाठी संघर्ष अजूनही सुरूच आहे.

तर सुशांतच्या मृत्यूचा तपास अजूनही संपला नसल्याची सीबीआय सूत्रांनी माहिती दिली आहे असे प्रयांका नावाच्या एका ट्विटर खात्यावरून म्हटले गेले आहे.

सुशांतची चाहती असलेल्या पियाली म्हणतात की सुशांतच्या मृत्यूच्या तपासात आम्ही राजकीय हस्तक्षेप खपवणार नाही.

आत्तापर्यंत #SushantSinghRajput हा हॅशटॅग वापरून ३ लाख ३३ हजार पेक्षा अधिक ट्विट्स करण्यात आली आहेत. तर #Insaaf4SSR हा हॅशटॅग १ लाख ९१ हजार पेक्षा अधिक ट्विट्समध्ये वापरला गेला आहे. मिनिटागणिक या ट्विटसची संख्या वाढत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा