अभिनेता सुशांतसिंह राजपूत आज, रविवारी ३८ वर्षांचा झाला असता. त्याची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिने आपल्या या लाडक्या भावाची हळवी बाजू तिचे नवे पुस्तक ‘पेन’मध्ये मांडली आहे.अमेरिकेत राहणारी सुशांतसिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिने सुशांतचे नवीन पुस्तक ‘पेन: ए पोर्टल टू एनलाइटनमेंट’मध्ये एक प्रेमळ लेख लिहिला आहे.
सुशांतसिंहचा जन्म
तिच्या जन्मानंतर तिच्या आईवडिलांना मुलाची आशा होती कारण तिच्या आईने तिचा पहिला मुलगा गमावला होता. श्वेता लिहिते, ‘माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला अनेकदा सांगितले आहे की आई आणि वडिलांना मुलगा हवा होता. कारण तिच्या आईचे पहिले मूल मुलगा होते आणि तिने त्याला लहान वयात गमावले होते. बर्याच विधी आणि धार्मिक स्थळाच्या भेटीनंतर सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला. ‘मोठे झाल्यावर आम्ही एकमेकांच्या अक्षरशः सावल्या होतो – नेहमी एकत्र. आम्ही खेळायचो, नाचायचो, अभ्यास करायचो आणि खोडसाळपणा करायचो, खायचो आणि झोपायचो आणि सर्व काही एकत्र केले. लोक विसरले होते की, आम्ही दोन स्वतंत्र व्यक्ती आहोत; ते आम्हाला ‘गुडिया-गुलशन’ म्हणायचे,’ असे श्वेताने लिहिले आहे. गुडिया आणि गुलशन तिची आणि सुशांतची टोपणनावे आहेत.
हे ही वाचा:
११० किलो फळफुलांचा अभिषेक, ८१ कलश पाण्याने शुद्ध केले राममंदिर!
लंडनच्या गल्ल्यांमध्ये ‘जय श्रीरामा’चा गजर!
उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टने निमंत्रण मिळाले!
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच वायूदलाच्या रणरागिणी
लग्नाच्या वेळचा प्रसंग
“मी निघायची तयारी करत असताना, भाईने मला घट्ट मिठी मारली, आमच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहात होत्या. हा एक हृदयद्रावक क्षण होता – आम्हाला माहीत होते की आम्ही आता एकत्र राहणार नाही, आम्हाला पूर्वीसारखे एकमेकांना पाहण्याची लक्झरी मिळणार नाही,’ असे लिहिल्यानंतर श्वेताने तिच्या लग्नानंतर ती अमेरिकेत स्थलांतरित झाली तेव्हा मागे तिच्या भावाला सोडल्याचा पश्चात्ताप व्यक्त केला आहे.
२०१७ची भेट ठेरली शेवटची
सुशांत बॉलीवूडमध्ये व्यग्र झाल्याने ती सन २०१४पासून ते २०१७पर्यंत दरवर्षी भारतात येऊन त्याला भेटत असे. ती सन २०१८ आणि २०१९ मध्ये भेट देऊ शकली नव्हती. १४ जून २०२० रोजी तो त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याच्या चार दिवस आधीच तिने त्याला फोन करून अमेरिकेला बोलावले होते. १३ जूनच्या रात्री तिच्या पतीने तिला जेव्हा ही माहिती दिली, तेव्हा तिच्या अंगावरून शिरशिरी गेली. ‘ मला जणू अर्धांगवायू होऊन मी पलंगावर पडले. मी ओरडले नाही. रडले नाही,’ असे तिने लिहिले आहे.
अखेरची भेटही मिळू शकली नाही
करोनाच्या साथीत अमेरिका ते भारतादरम्यान विमानाची नियमित उड्डाणे होत नव्हती. त्यामुळे तिला खूप उशीरा तिकीट मिळाले. ती भारतात पोहोचेपर्यंत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.