25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषसुशांत सिंगचे घर विकत घेणार अदा शर्मा?

सुशांत सिंगचे घर विकत घेणार अदा शर्मा?

तीन वर्षांपासून घर विक्रीच्या प्रतीक्षेत होते

Google News Follow

Related

तीन वर्षांपूर्वी चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा ज्या घरात मृत्यू झाला, ते घर आता विकले गेले आहे. एका अभिनेत्रीने हे घर विकत घेतले आहे. बरेच दिवस या घराच्या विक्रीसाठी किंवा घर भाड्याने देण्यासाठी या घराचे एजन्ट रफिक मर्चंट यांनी जाहिरात दिली होती पण त्याला योग्य ग्राहक मिळत नव्हता. द केरळ स्टोरी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री अदा शर्माने हे घर विकत घेणार असल्याचे समोर आले आहे.

 

सुशांत सिंगचा मृत्यू १४ जून २०२०मध्ये अतिशय धक्कादायक अशा परिस्थितीत झाला. घरातच त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. तो खून होता की आत्महत्या याचा तपास नंतर लागू शकला नाही. पण त्यानंतर ते घर कुणीही भाड्याने घेतले नाही की ते विकलेही गेले नाही. रफिक मर्चंटने या घराच्या व्हीडिओसह या घराची जाहिरात केली होती. पण तीन वर्षे ते घर रिकामेच होते. टेलीचक्कर या वेबसाईटने हे घर अदा शर्माने विकत घेतले असल्याची बातमी दिली आहे.

हे ही वाचा:

दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी प्रज्ञान रोव्हरच्या ‘शिवशक्ती’ पॉइंटभोवती प्रदक्षिणा

अमेरिकेला भारतीय वंशाचा अध्यक्ष मिळणार?

अमेरिकेत फुटबॉल सामन्यादरम्यान गोळीबार

हिमाचल प्रदेशात भूस्खलन; ५४ घरे खचल्याची भीती

त्या घराची नेमकी किंमत मात्र कळू शकली नसली तरी त्या घरासाठी सुशांत सिंग हा प्रतिमहिना ४.५ लाख रुपये भाडे देत होता असे कळते. रफिक मर्चंटने या घराची जाहिरात देताना भाड्याची रक्कम ५ लाख आणि सहा महिन्यांचे डिपॉझिट म्हणून ३० लाख देण्याची तयारी असलेल्या ग्राहकांना आवाहन केले होते.

 

याआधी, या घरात ही घटना घडल्यामुळे कुणीही हे घर घेण्यास तयार होत नसल्याच्या बातम्या येत होत्या. गेल्या वर्षी डिसेंबर २०२२मध्ये मर्चंटने या घरासाठी जाहिरात दिली होती. मॉन्ट ब्लॅंक अपार्टमेंटमधील हे चार खोल्यांचे घर आहे. जवळपास अडीच हजार चौरस फूट इतक्या आकाराचे हे घर आहे. मुंबईतील बांद्रा पश्चिम येथील कार्टर रोड येथे हे घर असून ते सहाव्या मजल्यावर आहे.

 

सुशांतसिंग या घरात २०१९मध्ये राहायला आला होता. त्यावेळी साडेचार लाख रुपये भाडे भरून त्याने घरात प्रवेश घेतला होता. त्याच्यासोबत रिया चक्रवर्ती ही अभिनेत्रीही होती. शनिवारी सुशांत सिंगच्या या घराच्या बाहेर अदा शर्मा उभी असल्याचे दिसत होते. पण अदाने अद्याप त्याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा