सूर्यकुमारमुळे भारताचे आव्हान जिवंत

७ विकेट्सनी विंडीजवर विजय मिळविला

सूर्यकुमारमुळे भारताचे आव्हान जिवंत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. या मालिकेत यजमान विंडिजने २-० अशी आघाडी घेतली होती. पण तिसरा सामना भारताने सात विकेट्सने जिंकल्यामुळे आता या मालिकेत भारत १-२ पिछाडीवर आहे. सूर्यकुमार यादवच्या ४४ चेंडूतील ८३ धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने हा विजय मिळविला. त्याच्या या तडाखेबंद खेळीत १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

त्याआधी वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १५९ धावा केल्या होत्या. त्यात रोवमन पॉवेलच्या ४० तर सलामीवीर ब्रॅंडन किंगच्या ४२ धावांचा समावेश होता. कुलदीप यादवने २८ चेंडूंत ३ बळी घेत सर्वोच्च कामगिरी केली. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येक १ बळी घेतला.

 

या धावसंख्येला उत्तर देताना भारताल झटपट धक्का बसला तो यशस्वी जयस्वाल अवघी १ धाव काढून बाद झाल्यामुळे. तेव्हा भारताच्या खात्यात अवघ्या ६ धावा होत्या. त्यानंतर शुभमन गिलही लवकर बाद झाला. भारताच्या खात्यात पाचव्या षटकात ३२ धावा जमा झालेल्या असताना शुभमन ६ धावा काढून बाद झाला. जोसेफने त्याला चार्ल्सकडे झेल द्यायला भाग पाडले. पण हे दोन फलंदाज गमावल्यावर भारताचे सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी भारताला सावरले.

हे ही वाचा:

चीनच्या पे-रोलवर पोसलेले पत्रकार किती?

बलुचिस्तानमध्ये सुरुंगस्फोट; युनियन कौन्सिलच्या अध्यक्षासह सात जणांचा मृत्यू

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२ रेल्वे स्थानके चमकणार

सेप्टिक टॅंकमधील मृतदेहाचे गूढ उकलले; एकाला अटक

 

सूर्याने ८३ आणि तिलकने ४९ धावांची खेळी केली. दोघांनी ८७ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारचा अर्धशतकी खेळी जोसेफनेच थांबवली. पण तोपर्यंत भारताने सामन्यावर पकड मिळविली होती. हार्दिक पंड्याने २० धावांची खेळी करत सामन्याचा विजय निश्चित केला. १७.५ षटकातच भारताने सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफने २५ धावांत २ बळी घेतले. यशस्वी जयस्वालचे हे टी-२० क्रिकेटमधील पदार्पण होते. सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू सूर्यकुमार यादव निवडला गेला.

 

स्कोअरबोर्ड : वेस्ट इंडिज ५ बाद १५९ (ब्रँडन किंग ४२, रोवमन पॉवेल ना, ४०, कुलदीप यादव २८-३) पराभूत वि. भारत ३ बाद १६४, जोसेफ २५-२)

Exit mobile version