बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा नवा १८ वा मोसम लवकरच क्रिकेटप्रेमींच्या भेटीला येणार आहे. १८ व्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होईल तर पहिला सामना हा बंगळुरु विरुद्ध कोलकाता या दोन संघांमध्ये रंगणार आहे. आयपीएलची चर्चा सर्वत्र सुरू झाली असून प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिली आहे.
आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघ म्हणून ओळखले जाणारे मुंबई आणि चेन्नई हे २३ फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, मुंबई संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या याला हंगामातील पहिला सामना खेळता येणार नसल्याची बाब पूर्वीपासूनचं स्पष्ट होती. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईच्या संघाची धुरा कोणाच्या हाती असणार याची चर्चा होती. हार्दिकच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध मुंबईचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.
मुंबईच्या पहिल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यासाठी संघाचा कर्णधार म्हणून सुर्यकुमार यादव हा जबाबदारी सांभाळणार आहे. हार्दिक पंड्याने पत्रकार परिषदेत चेन्नईविरुद्ध कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपदाची सूत्र असणार? याबाबत स्वतः माहिती दिली आहे. हार्दिक पंड्या याला एका सामन्याची बंदी घालण्यात आल्याने त्याला चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळता येणार नाही. हार्दिकने गेल्या हंगामात एकच चूक तीन वेळा केल्याने त्याला या शिक्षेचा सामना करावा लागत आहे. हार्दिक एकूण तीन वेळा ओव्हर रेट कायम राखू शकला नव्हता त्यामुळे हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली.
हे ही वाचा..
आपचा सीसीटीव्ही घोटाळा; सत्येंद्र जैन यांच्यावर ७ कोटींची लाच घेतल्याचा आरोप
बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाला आढळला आयईडी
रशिया-युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी पुतिन- मोदींचे संबंध उपयुक्त ठरतील
लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी लालूप्रसाद यादव ईडी कार्यालयात
हार्दिक आणि मुंबईचा हेड कोच या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत चेन्नईविरुद्ध कोण कॅप्टन असणार याबाबत सांगितले की, सुर्यकुमार यादव संगाचे नेतृत करेल. तसेच मुंबईने सोशल मीडियावर पोस्ट करत सूर्यकुमार चेन्नईविरुद्ध कर्णधार असेल, असं जाहीर केलं आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या नावाचीही जोरदार चर्चा होती.