पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये येणे ही खूप मोठी गोष्ट!

शमीनंतर सूर्यकुमारकडूनही नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने

पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये येणे ही खूप मोठी गोष्ट!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T२०I मालिकेसाठी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने ‘एकदिवसीय विश्वचषक २०२३’ फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून संघाच्या हृदयद्रावक पराभवानंतर खेळाडूंना दिलेल्या प्रेरणादायी शब्दांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. बीसीसीआयच्या व्हिडीओद्वारे बोलताना सूर्यकुमार यादव यांनी वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची ड्रेसिंग रूमला भेट ही मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

सूर्यकुमार यादव म्हणाला की,पराभवानंतर, आम्ही सगळे खेळाडूं ड्रेसिंग रूममध्ये होतो.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी सर्वांना भेटून आम्हाला प्रेरणा दिली.पंतप्रधान मोदी आम्हाला भेटून म्हणाले की, हा एक खेळ आहे, खेळामध्ये जिंकणे किंवा हरणे होत राहते.त्यांनी आम्हाला सांगितले की, सतत पुढचा विचार करत पुढे जात राहिले पाहिजे.तोटा भरून काढण्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल पण त्यांचे ५-६ मिनिटांचे प्रेरक भाषण खूप महत्वाचे होते.देशाचा नेता आम्हाला प्रेरणा देण्यासाठी आमच्या ड्रेसिंग रूममध्ये येणे ही आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असल्याचे सूर्यकुमार यादव याने सांगितले.तसेच पंतप्रधानांनी ज्या-ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही खूप चांगल्याप्रकारे ऐकल्याचे सूर्यकुमार यादवने सांगितले.

हे ही वाचा:

आता संजय राऊत म्हणतात, इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता!

अंतरावालीत पिस्तुलासह अटक झालेला ऋषीकेश बेदरे कोण?

शालेय आहारात अंडी कशाला? शाकाहारच हवा!

‘दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल’ परंतु त्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल!

सूर्यकुमार यादवने चाहत्यांचे देखील आभार मानले.सूर्यकुमार म्हणाला की, विश्वचषक २०२३ च्या फायनलला ४-५ दिवस झाले आहेत.भारताच्या पराभवामुळे क्रिकेट चाहते नाराज आहेत,आम्ही देखील नाराज झालो आहोत.मात्र, भारतातील आणि जगभरातील आमच्या चाहत्यांनी दाखवलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.हा एक खेळ आहे, आणि तो आपल्याला खूप काही शिकवतो.तुम्ही आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहा, असे सूर्यकुमार यादव म्हणाला.

तसेच आगामी काळात येणाऱ्या स्पर्धांमध्ये आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.पुढच्या वर्षी आणखी एक आयसीसी स्पर्धा येत आहे, आम्ही त्याच उर्जेने खेळू आणि जिंकू, अशी आशा आहे,” सूर्यकुमार यादव म्हणाला.दरम्यान, सूर्यकुमार यादव सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या T२०I मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

 

 

 

Exit mobile version