वानखेडेवर ‘सूर्या’ तळपला!

वानखेडेवर ‘सूर्या’ तळपला!

सूर्यकुमार यादवने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध तुफानी आक्रमक खेळी केली. सूर्याने २७३.६८ च्या स्ट्राइक रेटने १९ चेंडूत ५२ धावा चोपून काढल्या. त्याच्या या दे दणादण खेळीने अनेक विक्रम मोडले गेले. मोसमातील पहिल्याच सामन्यात सूर्याभाऊ शून्यावर बाद झाले होते. पण, दुसऱ्या सामन्यात त्याने अशी शानदार खेळी केली की त्याने प्रतिस्पर्धी आरसीबीला गुडघे टेकण्यास भाग पाडले.

हेही वाचा :

विमाने खरेदी करण्यासाठी ६५ हजार कोटींची निविदा

कुराण जाळणारा इराकचा सलवान मोमिक जिवंत!

“आम आदमी पार्टीला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात के कविता यांची महत्त्वाची भूमिका”

‘जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, लवकरच विधानसभा निवडणूक होणार’!

अशा प्रकारे मुंबई जिंकली
या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ विकेट गमावत १९६ धावा केल्या होत्या. संघासाठी कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत ३ गडी राखून विजय मिळवला.

 

Exit mobile version