मुंबईत वाहन चालवणे जगात सर्वाधिक तणावपूर्ण!

मुंबईत वाहन चालवणे जगात सर्वाधिक तणावपूर्ण!

जगातल्या विविध ३६ शहरांमधून वाहन चालवण्यासाठी तणावपूर्ण शहर निवडण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतातील दोन मुख्य शहरांचा क्रमांक आला आहे. सर्वेक्षणानंतर जाहीर केलेल्या यादीत मुंबई शहराचा क्रमांक अग्रस्थानी असून पॅरिस, जकार्ता नंतर दिल्ली शहराचा क्रमांक आहे. त्यामुळे वाहन चालविण्यासाठी मुंबई सर्वात जास्त तणावपूर्ण शहर ठरले आहे.

सर्वेक्षणासाठी केलेल्या अभ्यासात शहरातील वाहनांची संख्या, वाहतूक कोंडीची तीव्रता, दरडोई वाहनांची संख्या, सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय, शहराची घनता, अपघातांची संख्या रस्त्यांची गुणवत्ता अशा घटकांचा समावेश होता. या घटकांच्या आधारे दिलेल्या गुणांच्या आधारे मुंबईला वाहन चालवण्यासाठी सर्वाधिक तणावपूर्ण शहर म्हणून ठरविण्यात आले.

हे ही वाचा:

बिजिंगपर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-५ ची आज चाचणी

नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार

परमबीर हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आणखी एक समन्स

जाऊबाई जोरात, मग पोलिसांनी काढली वरात!

मुंबईत प्रति किलोमीटर ५१० वाहने आहेत तर, प्रत्येक चौरस किलोमीटर एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आहे. जगातील सर्वात व्यस्त वाहतूक व्यवस्था मुंबईत असूनही, मुंबईला ७.४ गुण मिळाले आणि वाहन चालविण्यासाठी तणावपूर्ण शहरांच्या यादीत मुंबईचा पहिला क्रमांक आला. पेरूची राजधानी असलेले लिमा शहर हे मात्र वाहन चालविण्यासाठी सर्वात कमी तणावपूर्ण असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. लिमा शहराला सर्वेक्षाणादरम्यान २.१ गुणांकन मिळाले आहे.

वाहन चालवण्यासाठी सर्वात तणावपूर्ण शहरे

वाहन चालवण्यासाठी कमीत कमी तणावपूर्ण शहरे

मुंबई शहर हे वाहन चालविण्यासाठी तणावपूर्ण शहर आहे असे शहरातील नागरिक आणि वाहन चालक सतत सांगत असतात. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करून परिस्थितीचा आढावा घ्यावा. या समितीमध्ये नागरिक प्रतिनिधींचा समावेश असावा. आधीच्या समितींच्या किती शिफारसी अंमलात आणल्या हे ही पाहावे, असे मत वाहतूक तज्ज्ञ ए. व्ही. शेनॉय यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version