नागपूर बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षणाला सुरूवात

नागपूर बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षणाला सुरूवात

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) मुंबई- नागपूर मार्गिकेच्या सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. या सर्वेक्षणातून पुढील चार महिन्यात जमिनीवरची माहिती उपलब्ध होईल.

एनएचएसआरसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सारख्या एका रेषेत असणाऱ्या प्रकल्पांत जमिनीवरील डेटा फार महत्त्वाचा असतो. या प्रकल्पांच्या आखणीसाठी या डेटाची गरज असते. डेटा गोळा करण्याच्या या पद्धतीत लेझर डेटा, जीपीेएस, उड्डाणांची विविध परिमाणे आणि प्रत्यक्ष छायाचित्रे यांचादेखील वापर केला जातो.

हे ही वाचा:

एपीआय वाझेंना तात्काळ निलंबित करा – आमदार अतुल भातखळकर

कोळसा घोटाळ्याप्रकरणी ममतांच्या अडचणीत वाढ

मुंबई- नागपूर प्रस्तावित मार्ग ७३६ किमी लांबीचा आहे. या मार्गामुळे मुंबई, नागपूरसह वर्धा, मालेगाव, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, आणि शहापूरसोबत जोडली जाईल.

एनएचएसआरसीएलने सांगितले की या मार्गिकेवर गाड्या किमान ताशी ३२० किमी प्रति तास या वेगाने जाऊ शकतील. त्यामुळे मुंबई- नागपूर प्रवासाचा अर्धा वेळ वाचणार आहे. सध्या या दोन शहरांत सर्वात छोट्या अंतरावरून जाणारी केवळ मुंबई- नागपूर दुरांतो एक्सप्रेस गाडी आहे. या गाडीला हे अंतर कापायला ११.३० तास लागतात.

हे ही वाचा:

देशात सात बुलेट ट्रेन मार्गिकांची तयारी

काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत बोलताना देशभरात सात विविध मार्गिकांवर बुलेट ट्रेन चालवण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले होते. सध्या भारतात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम चालू आहे.

Exit mobile version