संतोष देशमुख हत्याप्रकरणी एटीएस, सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. हत्येप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. प्रकरणाशी संबंधित आरोपींना लवकरात-लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. याच पार्श्वभूमीवर आज (डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानात सरपंच परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सुरेश धस यांनी आंदोलनात सहभागी होत देशमुख हत्याप्रकरणातील प्रसंग इतर सरपंचांना सांगितला.
सदाभाऊ खोत देखील या आंदोलनात सहभागी होते. सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख त्या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य होवू शकला असता, तेवढा तो तगडा होता. त्याचा गुन्हा काय तर मागितलेल्या २ कोटी खंडणीच्या तो आडवा आला. गावातील दलित वॉचमनला मारले, त्याला मारु नका एवढेच त्याने सांगितले. एवढीच त्याची चूक होती, दुसरी कोणतीच नाही. त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
ते पुढे म्हणाले, त्याचे मारहाणीचे चित्रीकरण करण्यात आले. व्हिडीओ कॉल करून दुसऱ्याला दाखवत होते बघा याला कसं मारतोय आम्ही. तो विव्हळतोय, ओरडतोय पाण्यासाठी भिक मागतोय. तो म्हणत होता, मी कोणचेच नाव सांगणार नाही, माझ्या गावालाही नाव सांगणार नाही. आता बास करा, मला मारू नका असे म्हणत होता. तरी देखील आरोपी मारत होते. आरोपी मारहाण करताना बेभान झाले होते. या लोकांचे जे आका आहेत यांना जे सांभळणारे हे १०० टक्के ३०२ मध्ये येणार आहे. यांच्यावर मोक्का लागला पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी यावेळी केली.
हे ही वाचा :
सलमान खान आता राहणार बुलेटप्रूफ काचेत
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम आरोपांची केली चीरफाड!
स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते होणार हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे उद्घाटन
दिल्ली विधानसभा निवडणूक: ५ फेब्रुवारीला मतदान; ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी