पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल याला आज(२५ मे) पहाटे अटक करण्यात आली होती.सुरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पुणे गुन्हे शाखेच्या एका पथकाने सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरावर छापा टाकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गुन्हे शाखेच्या एका पथकाने ‘अग्रवाल पॅलेस’ नामक घरावर छापा टाकत झाडाझडती सुरु केली आहे.यापूर्वी विशाल अग्रवालला ताब्यात घेण्यात आले होते तेव्हा पथकाने घरावर छापेमारी केली होती.यानंतर सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आल्यानंतर आज पुन्हा पुणे पोलिसांच्या पथकाने घरावर छापा टाकत झाडाझडती सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र अग्रवालच्या एका मोबाईलचा तपास पथक घेत आहे.त्यातून काही माहिती समोर येते का ते पथकाला पहायचे आहे.तसेच बंगल्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही माहिती समोर येईल याकरिता पथकाने छापा टाकला आहे.
हे ही वाचा:
‘हेलिकॉप्टरमधून फिरणारे लवकरच तुरुंगात जातील’
अजय देवगण, रोहित शेट्टी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले ‘सिंघम अगेन’चे शूटिंग!
पॅट कमिन्सचा हैदराबादचा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत
अग्रवाल कुटुंबीयांनी चालकाचा फोन काढून घेतला, खोलीत डांबून ठेवले, जबाब देण्यासाठी धमकावले आणि….
बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी देखील पथकाला करायची आहे.कारण सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर त्यांचा ड्राइव्हर गंगाधर पुजारी याने आरोप केला आहे.धमकावून दोन दिवस बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप ड्राइव्हर गंगाधर पुजारी याने केला आहे.या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.ड्राइव्हर केलेल्या आरोपानुसार बंगल्यातील सीसीटीव्हीच्या फुटेजमधून काही माहिती मिळते का.यासाठी पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव शेरीतील अग्रवाल यांच्या बंगल्यावर छापा टाकला आहे.