शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी सूरज चव्हाण सोमवारी त्यांच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले आहेत. ईडी मुंबईतील कथित कोविड केंद्र घोटाळ्यातील मनीलाँड्रिंग लिंकची चौकशी करत असल्याचे असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मागील काही दिवसापूर्वी ईडीने सूरज चव्हाण यांच्या घरी धाड टाकत कारवाई केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे आपले निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या राहत्या घरी त्यांना भेटायला गेले होते. यावर नितेश राणे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.सिंधुदुर्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, ८ जून २०२० जेव्हा दिशा सालियनची हत्या झाली. त्यानंतर १३ जूनला सुशांत सिंगला काही लोक भेटायला गेले होते. भेट झाल्यानंतर काहीच दिवसात सुशांत सिंग राजपूत याची हत्या झाली. सूरज चव्हाण यांना आदित्य ठाकरे कशासाठी भेटायला घरी गेले होते. भेटायला गेले होते की धमकी देण्यासाठी गेले होते, याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. ते पुढे म्हणाले, दिशा सालियनचा जसा मृत्यू झाला त्यानंतर लगेचच सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला. दिशा सालियनचं मृत्यू प्रकरण दाबण्यासाठी सुशांत सिंग राजपूतवर दबाव टाकण्यात येत होता. सुशांत सिंग ऐकत नसल्याने त्याची हत्या करण्यात आली.
तसंच काही सुरज चव्हाण बाबत घडणार नाही ना? असं काही असेल तर त्यांची काळजी पोलिसांनी, संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. सुरज चव्हाण यांच्यावर घातपाताची शंका व्यक्त करत, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरें यांचं नाव घेत टीका केली.सूरज चव्हाणचा मनसुख किंवा सुशांत सिंग होणार नाही ना? याची दखल संबंधित विभागाने घ्यावी, असेही ते पुढे म्हणाले.उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचा इतिहास आहे.’जे-जे त्यांच्या आडवे आले त्यांना-त्यांना त्यांनी संपवले’ आहे, असा थेट आरोप ठाकरे कुटुंबावर नितेश राणे यांनी केला.
हे ही वाचा:
आफ्रिकी-युरोपीय बाजारात भारताच्या व्यापाराचा वाजणार डंका
कमी उंचीमुळे मुलींचा नकार येत होता म्हणून त्याने खर्च केले ६६ लाख
जैन मंदिरात आता जीन्स, हाफ पँट, फ्रॉक किंवा फाटलेले कपडे बंद
नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधा उभारायला चीनची पाकिस्तानला मदत
आजच्या सामना वृत्तपत्रात ‘भारतातील वॅगनर ग्रुप’ असा अग्रलेख छापण्यात आला होता. त्याचा समाचार घेत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, संजय राऊत यांना वॅगनर ग्रुपचा इतिहास माहीत तरी आहे का?. थोडी माहिती घेतली असती तर पाटण्यात विरोधकांची बैठक झाली त्या बैठकीला वॅगनर ग्रुप म्हणायची हिंमत झाली नसती. संजय राऊत हे घरफोड्या आहेत .वॅगनर ग्रुपचा लीडर नाझी विचारसरणीचा होता. मागील काही दिवसापूर्वी पाटणा येथे देशातील १५ विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.
महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे असे दिग्गज नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीवर देखील नितेश राणे यांनी आक्षेप घेत म्हणाले, संजय राऊत यांना पाटण्यात भेटलेले नेते देखील नाझी विचारसरणीचे आहेत का? संजय राऊत याना असे म्हणायचे आहे का? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. राऊत यांच्या बुद्धीचे कौतुक करतो.स्वतःच्या मालकाचे वाभाडे काढणारे हे कामगार आहेत, असेही ते म्हणाले. पाटण्यात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे मेहबूब मुफ्ती यांच्या बाजूला बसले होते.
ठाकरे यांच्यावर टीका करत म्हणाले, उद्धव ठाकरेंना पूर्वी किती मानसन्मान मिळायचा आणि पाटण्यात किती मिळाला हे पाहिलं आम्ही.एका कोपऱ्यात मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला उद्धव ठाकरेंना टाकण्यात आले होते. बांद्रा येथील ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर चालवून महानगरपालिकेने कारवाई केली त्यावर देखील राणे म्हणाले, मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते. अनिल परब आणि काही लोक शेंबड्या पोरांसारखे मोर्चा काढताना दिसत आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव आज महाराष्ट्र दौऱ्यावर ६०० गाड्यांच्या ताफ्यासह पंढरपूरला येणार असल्याचे विचारल्यास राणे म्हणाले, के.सी.राव चांगल्या मनाने देवाचे दर्शन घेण्यासाठी येणार असतील तर आमचा त्यावर काहीही आक्षेप नाही, कारण आम्ही सुद्धा देवदर्शनाला तिरुपती सारख्या अशा इतर देवस्थळांना भेटण्यासाठी इतर राज्यात जात असतो.
कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर असताना म्हणाले होते की, महाराष्ट्रामधील फडणवीस आणि शिंदे सरकारला उलथवून टाकू. त्यावर राणे म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री हे पाकिस्तानची भाषा बोलतात. ते कर्नाटकमध्ये निवडून आल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागेल हे सर्व जनतेने पाहिलंय.महाराष्ट्रामध्ये हिरवं-करण करण्यासाठी ते महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये आले होते का?. आमचं महाराष्ट्रराज्य हे हिंदुत्ववादी राज्य आहे.महाराष्ट्रामध्ये पाकिस्तनाचे झेंडे , नारे सहन कोणीही करणार नाही आणि त्यांना इथे उभे करणार नसल्याचे, राणे म्हणाले.