न्यूज १८ च्या एका वादविवाद चर्चेत कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांच्यावर अत्यंत अपमानास्पद टीका केली आहे. या त्यांच्या टीकेबद्दल सर्वच स्तरातून आता निषेध नोंदवला जाऊ लागला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या द गार्डियनच्या एका टिपण्णीबद्दल ही चर्चा आयोजित करण्यात आली होती. जर एखादा दहशदवादी भारतातून पळून गेला त्क़र त्याला मारण्यासाठी आम्ही बाहेर सुद्धा जाऊ असे वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केले होते.
या चर्चेदरम्यान शहजाद पूनावाला म्हणाले की, सुप्रिया श्रीनाते यांनी नॉर्दन कमांडमधील डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सचे चुकीचे नाव घेतले होते. २०२० मध्ये त्या पोस्टवर कोण होते आणि आता २०२४ मध्ये त्याचे नेतृत्व कोण करत आहे या माहितीसह पूनावाला यांनी त्यांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुप्रिया श्रीनाते यांनी शहजाद पूनावालाला ‘ब्लडी फूल’ म्हटले. यावर शेहजाद पूनावाला यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज सुप्रिया श्रीनातेने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि राष्ट्रीय टीव्हीवर मला एकदा नव्हे तर दोनदा शिवीगाळ केली आहे. त्यांनी कंगना रनौत आणि मंडीतील लोकांना सुद्धा सोडले नाही.त्यांनी एका व्हिडीओ शेअर करून म्हटले आहे की,
व्हिडीओमध्ये त्यांनी उत्तरी सैन्याच्या कमांडरचे चुकीचे नाव एकदा नाही तर दोनदा घेतले आहे.
हेही वाचा..
कमलनाथ यांच्या ‘हनुमाना’चा भाजपमध्ये प्रवेश!
भारत मालदीवला पाठवणार आवश्यक वस्तू!
महायुतीचे ठरले! कल्याणमधून श्रीकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात
शेहजाद पूनावाला यांनी देखील सुप्रिया श्रीनातेने भूतकाळात अशाच प्रकारे शिवीगाळ केल्याचा उल्लेख केला. त्यांनी लिहिले की श्रीनाते यांनी माझ्यावर अशा प्रकारे टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राजदीप सरदेसाई यांच्या शोमध्ये त्यांनी अशाच प्रकारे टिपण्णी केली होती. त्यांनी माझ्या वृद्ध आईचा अपमान केला होता. विशेष म्हणजे श्रीनाते यांनी काही दिवसापूर्वी कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते आणि समर्थकांनी तिच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. सध्या डिलीट केलेल्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी विचारले होते की, “क्या भव चल रहा है मंडी में कोई बतायेगा? असे म्हटले होते. त्यानतंर श्रीनाते यांनी या पोस्ट बद्दल बचावात्मक पवित्रा घेत त्यांच्या टीममधील सदस्यांना दोष देणारा एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला होता.