‘कलम ३७०वर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा भारतात दुफळी निर्माण करणाऱ्यांचा पराजय आणि एकता व अखंडतेच्या प्रसाराच्या राजकारणाचा विजय आहे,’ असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मुख्य संरक्षक इंदेश कुमार यांनी केले.
‘मुस्लिम राष्ट्रीय मंचाची नवी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक झाली, ज्यात जम्मू आणि काश्मीरचा विकास आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासंदर्भात चर्चा झाली. वर्षानुवर्षे ज्या प्रकारे विनाशाचे राजकारण केले गेले, ते बदलून जम्मू आणि काश्मीरच्या समृद्धी आणि विकासासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन योगदान दिले पाहिजे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला,’ अशी माहिती मंचाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी शाहिद सईद यांनी दिली.
‘फुटीरतावादी, षड्यंत्रकारी, दहशतवादी, हिंसा आणि द्वेषाची भिंत उभी करणारे कलम ३७० कायमस्वरूपी संपुष्टात आले आहे. न्यायालयाने एका महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख केला आहे. सन १९८०पासून ते आतापर्यंत हजारो लोकांची हत्या झाली आणि लाखो नागरिक विस्थापित झाले. यासाठी चौकशी समिती स्थापन केली जावी, जेणेकरून खऱ्या दोषींचा चेहरा उघड होईल,’असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुलीला वाचवण्यासाठी केरळमधील महिलेला येमेन जाण्यास परवानगी!
काश्मीरमध्ये दगड फेकणारी मुलगी बनली फुटबॉलपटू; पंतप्रधानांनी घेतली दखल
शिवराज सिंह यांना भेटून त्या महिलांनी केली अश्रूंना वाट मोकळी!
भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!
चीनच्या ताब्यात असलेला काश्मीरही मिळवणे गरजेचे
‘पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरच नव्हे तर, चीनच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भूभागही भारतात येणे गरजेचे आहे. आता तो दिवस दूर नाही, ज्याच्यात यश मिळेल. कैलास मानसरोवर चीनपासून मुक्त होणे आवश्यक आहे. लडाख व जम्मू काश्मीरचा जो भूभाग चीनच्या ताब्यात आहे, तोसुद्धा परत मिळवला पाहिजे. तो दिवस दूर नाही, जेव्हा यात यश मिळेल,’ असेही इंद्रेश कुमार म्हणाले.