दिल्लीचे आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना सोमवारी (१५ एप्रिल २०२४ ) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे.सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अमानतुल्ला यांना वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.सर्वोच्च न्यायालयाने अमानतुल्ला यांना १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.यापूर्वीही दिल्ली उच्च न्यायालयाने अमानतुल्ला यांना अटकेतून दिलासा देण्यास नकार दिला होता.ईडीने सहा समन्स पाठवूनही ते हजर झाले नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते.आमदार असल्याकारणाने सुटकेची अपेक्षा करू शकत नाहीत.कायदा सर्वांसाठी समान आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.या निर्णयाला अमानतुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
हे ही वाचा:
मणिपूर:हिंसाचारात लुटलेली शस्त्रे ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये ठेवा!
तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट
“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”
राजस्थान: ट्रकच्या धडकेने कारला आग, सात जणांचा होरपळून मृत्यू!
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आमदार अमानतुल्ला खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १८ एप्रिल रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामिनाची मागणी फेटाळताना म्हटले की, जर ईडीकडे अटक करण्या योग्य पुरावे असतील ते आमदाराला अटक करू शकतात.